गांधीनगर/एनजीएन नेटवर्क
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना एक मोठा झटका मिळाला आहे. मानहानी प्रकरणात त्यांना न्यायालयाने दणका दिला असून, त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, सूरत न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देण्यात आला आहे. ज्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी आता रद्दच राहणार आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा यासंदर्भातील याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच प्रकरणीच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हा निर्णय सुनावला.
निकाल सुनावतेवेळी न्यायालयाच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी यांच्या विरोधात किमान 10 खटले विचाराधीन आहेत. हा खटला दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात आणखी काही तक्रारी आल्या आहेत. एक तक्रार तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वंशजांनी सुद्धा दाखल केली. अशात त्यांना दोषी ठरवले जात असेल तर त्यांच्यावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. आम्हाला कनिष्ठ न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्याची काहीच गरज वाटत नाही. त्यामुळे, राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय आता कोणताही पर्याय उरलेला दिसत नाही.