नाशिक/एनजीएन नेटवर्क
अखिल भारतीय महानुभाव संमेलन तथा श्रीमद्भगवद्गीता जयंती महोत्सव यंदा गुजरात राज्यात साजरा होणार असून दि. २०ते २२ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित या भव्य संमेलनात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी अ.भा. महानुभाव संमेलनाचे आयोजक दिनकर अण्णा पाटील, आमदार जितूभाई चौधरी व राजेंद्र जायभावे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच गुजरातची राजधानी गांधीनगर येथे मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची भेट घेतली असून त्यांनी या संमेलनास येण्यास मान्य केले आहे. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही या संमेलनास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.
अ.भा. महानुभाव संमेलन यावर्षी वाळविहीर (ता. कपराडा, जिल्हा बलसाड ) येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाची जोरदार तयारी सुरू असून संत मंहतांसह मान्यवरांना निमंत्रण देण्यात येत आहे. आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची भेट घेऊन संमेलनासाठी उपस्थित राहण्याची निमंत्रण देण्यात आले. तसेच सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांचे जन्मस्थान भडोच येथील दर्शनाचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती करणारे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळात महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, महंत कृष्णराज मराठे, गोपीराज शास्त्री सुकेणेकर, वाल्हेराज बाबा, सायराज बाबा, भाईदेव मुनी मानेकर, साहेबराव आव्हाड, सुनील सांगळे, भास्करराव गावित, लखमा भाई, रुपेश पाटील, रवी राठोड, महेश कटाळे, आबासाहेब अपसुंदे, दत्तात्रय गवळी, नितीन गायकवाड, शरद पवार, बाळासाहेब जगताप, रावजीभाई करडेल, दत्तात्रय जाधव, विठ्ठलराव घुटे, विलासराव घुटे, चंदर पाटील, नातू चौरा, चिमाजी कातकाडे, चंदू रोकडे आदींचा समावेश होता.