नाशिक/एनजीएन नेटवर्क
एमईटी संचलित भुजबळ नॉलेज सिटीतील इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीरिंग महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातर्फे पालक मेळावा आयोजित करण्यात आला. या पालक मेळाव्यासाठी ४०० पेक्षा जास्त पालकांचा सहभाग लाभला. विद्यार्थी-पालक आणि शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्यांची प्रगती समजावी आणि शिक्षक-पालकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साध्य होईल यावर चर्चा करण्यात आली.
प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. विनोद खैरनार यांनी पालकांना प्रथम सत्रात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांबद्दल विस्तृत माहिती दिली, प्रथम वर्ष विभागातील “दी ब्रेनीयाक्स” या विद्यार्थी मंचामार्फत कला, क्रीडा, मार्गदर्शनपर तत्सम विषयातील तज्ञ व्याख्याने आयोजित करण्यात आली. महाविद्यालयीन जीवनापासूनच समाजात वावरताना विद्यार्थ्यांनी वक्तशीरपणा आणि शिस्त कशी जोपासावी याबद्दल मार्गदर्शन केलेत. तसेच जे विद्यार्थी घरून महाविद्यालयात येण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करतात त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे जेणेकरून कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये याबद्दल काळजी घ्यावी. आपल्या पाल्याचा अभ्यास घेतांना पालकांची भूमिका समजावून सांगितली.
यानंतर प्रथम सत्रात झालेल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. विजयकुमार वाणी यांच्या हातून करण्यात आला, यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, महाविद्यालयात अभ्यासाव्यतिरिक्त विविध तांत्रिक कार्यक्रम, कार्यशाळा, तांत्रिक विषयातील निपुण असलेल्या मान्यवरांशी विद्यार्थ्यांचा संवाद आदी विद्यार्थी पूरक कार्यक्रम घेतले जातात. जागतिक स्तरावर ज्यांचा स्वीकार होईल असे उत्कृष्ट अभियंते आपल्या महाविद्यालयात कसे घडविले जातात आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव कसे कोरले याबद्दल सविस्तर माहिती सादर केली. प्रथम सत्रात ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण किंवा अपयश आले आहे त्यांनी पुन्हा जोमाने अभ्यास करून चांगल्या गुणांनी यश संपादित करावे याबद्दल प्रेरित केले. विद्यार्थीदशेतील युवकांनी यशाचे मार्गक्रमण कश्यापद्धतीने करावे आणि पालकांनी काय काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले.
उपस्थित पालकांपैकी काहींनी आपले मनोगत व्यक्त केले, महाविद्यालयत प्रवेश घेतल्यानंतर आपल्या पाल्यात आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानलेत. पालक मेळावा यशस्विरीत्या संपन्न झाल्याबद्दल संस्थेच्या विश्वस्त डॉ. शेफाली भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचलनाची जबाबदारी प्रा. स्नेहा पेखळे यांनी पार पडली. पालक मेळ्याचे काटेकोर नियोजन डॉ. राजेंद्र ढाके आणि प्रा. राजकुमार राजकुवर यांनी केले. तसेच प्रथम वर्ष विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.