देवळा : महेश शिरोरे
मविप्र समाज संस्थेच्या खामखेडा येथील अभिनव व जनता विद्यालयात पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार महेश शिरोरे हे होते. व्यासपीठावर पालक दीपक बोरसे,सुनील शेवाळे,दीपक मोरे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक पोतदार आर.पी ज्येष्ठ शिक्षक पाटील आर.के, खरे एस.डी,भामरे के.आर आदी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली विद्यालयाचे शिक्षक आहेर आर.एच यांनी प्रास्ताविकातून पालक मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला तसेच वर्षभरात राबविलेले उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता व क्रीडा या विभागातील अहवाल सादर केला.या मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व माता पालक संघाची निवड करण्यात आली. यावेळी बापू शिरोरे, पंडित पवार,दिंगबर हिरे, यासारख्या पालकांनी आपले प्रश्न मांडले विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पाटील आर.के व पाटील एल.एन यांनी पालकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि पालकांनी आपल्या पाल्या बाबत शाळेकडून केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यानंतर पालक मनोगतामध्ये सुनील शेवाळे, दीपक बोरसे यांनी पालकांनी एक जबाबदार पालक म्हणून आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.अध्यक्षीय मनोगतातून पत्रकार महेश शिरोरे यांनी जेव्हा पालक मेळावा आयोजित केला जातो तेव्हा पालकांनी आवर्जून उपस्थित राहून आपल्या पाल्यांच्या अडचणी नि:संकोचपणे मांडल्या पाहिजेत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक पोतदार आर.पी यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन करताना सांगितले की मविप्र संस्था नेहमीच विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून कार्य करते सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते.यावेळी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती शिंदे जे.टी यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Comments are closed.