नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती दरवर्षी ‘सद्भावना दिवस’ म्हणून साजरी केली जाते. महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे अधिकारी व कर्मचारी यांनी सद्भावना दिनानिमित्त सामुहिक प्रतिज्ञा घेतली. यावेळी जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांचे समवेत उपस्थितांनी प्रतिज्ञा वाचन केले.
याप्रसंगी प्रभारी सहाय्यक महाव्यवस्थापक हेमंत भामरे, प्रणाली विश्लेषक राजेंद्र सोनवणे, सहाय्यक विधी अधिकारी रणजीत बोम्मी रेड्डी, उपकार्यकारी अभियंते तुषार राणे,दीपक गडलिंग, उपव्यवस्थापक स्वप्नील गोराणे, श्रीकांत ढाकणे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed.