नाशिक/एनजीएन नेटवर्क
राज्यातील शेतकऱ्यांचे, मजुरांचे, बेरोजगारांचे, महिलांचे, ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी आपले काम अविरत सुरु राहणार असून छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपली वाटचाल कायम सुरूच राहील असे प्रतिपादन राज्याचे नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री पदी शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे आज पहिल्यांदा नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले. मुंबईतून सांताक्रुझ येथील निवासस्थान येथून नाशिककडे निघाल्यावर ठाणे, मुलुंड, मानकोली नाका,कल्याण जंक्शन राजनोली, वाशिंद,इगतपुरी,घोटी, रायगड नगर,शहरातील पाथर्डी फाटा येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत फुलांचा वर्षाव करून वाजतगाजत जंगी स्वागत केले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे जल्लोषात स्वागत झाल्यावर येथील कार्यालयात त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ हेही होते.
यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, माजी आमदार जयवंत जाधव, संजय पवार, शिवराम झोले,नानासाहेब महाले,पंढरीनाथ थोरे,दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक,आनंद सोनवणे,कैलास मुदलीयार,विष्णुपंत म्हैसधूने, वसंत पवार, गोरख बोडके,अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, गणेश डोमाडे, रमेश पालवे, प्रेरणा बलकवडे, योगिता आहेर, कविता कर्डक,प्रकाश लोंढे,सुरेखा निमसे, जगदीश पवार, प्रवीण बनकर, डॉ.योगेश गोसावी, सचिन कळमकर, मोहन शेलार, दिपक गोगड, प्रकाश वाघ, शशी हिरवे, रवी हिरे, नाना पवार, संजय खैरनार, अमोल थोरे, आशा भंदूरे, पूजा आहेर, किशोरी खैरनार, मीनाक्षी काकळीज, अमर वझरे, सागर मोटकरी, मकरंद सोमवंशी यांच्यासह हजारोंच्या संख्येने नाशिक शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते स्वागतासाठी हजार होते.
उपस्थितांना संबोधित करतांना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्यभरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अजितदादा व आम्ही सर्व सहकाऱ्यांनी हे पाऊल उचललं. हा प्रसंग येऊ नये म्हणून एकदा नाही अनेकदा प्रयत्न केले. मात्र हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. राज्यातील शेतकऱ्यांचे, मजुरांचे, बेरोजगारांचे, महिलांचे, ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असून सरकारच्या माध्यमातून राज्यातील जनतेसाठी विविध विकास कामे करण्यात येतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपण पुढे वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित जनसमुदायाचे आभार मानत यापुढील काळातही सर्व लोक आमच्या पाठीशी राहाल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पाथर्डी फाटा ते भुजबळ फार्म वाजतगाजत मिरवणूक
छगन भुजबळ यांचे नाशिक शहरात पाथर्डी फाटा परिसरात आगमन होताच पाथर्डी फाटा ते भुजबळ फार्म पर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी क्रेनच्या सहायाने मोठा पुष्पहार घालण्यात आला. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांकडून फुलांचा वर्षाव करत स्वागत केले. दरम्यान नाशिक शहरात पाथर्डी फाटा येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी युवकांनी बाईक रैली काढत त्यांचे स्वागत केले.