नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
के के वाघ शिक्षण संस्था, के के वाघ फाउंडेशन, श्री. बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाउंडेशन आणि स्माईल व स्पिनॅच सेंटर ऑफ एक्सलन्स यांचे संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ सालच्या क. का. वाघ स्मृती चषक अर्थात पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक या जिल्हास्तरीय स्पर्धेचे शुक्रवारी के के वाघ विद्याभवन, भाऊसाहेबनगर येथे उद्घाटन उत्साहात पार पडले.
संस्थेच्या विश्वस्त मा. शकुंतलाताई वाघ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांना ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे जनसंपर्क संचालक मा. अजिंक्य बाळासाहेब वाघ, समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, रामनाथ आहेर, रामनाथ पानगव्हाणे, सुरेश भोज, तानाजी पूरकर, विश्वास घोलप, श्यामराव मोगल, दौलतराव कडलग, मोहिद्दीन शेख, पुंडलिक ताजणे, सचिन मोहाटे, वामन शिंदे, दिलीप आहेर, डॉ. शरद आहेर, दिनकर रकिबे, वैभव कुशारे, बंडू बैरागी, बाळू खरात, सोमनाथ लोंढे, संतू जाधव, कचरू भोज, काशिनाथ सूर्यवंशी, डॉ राहुल घायाळ, आप्पासाहेब आहेर उपस्थित होते.
दिनांक १२ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधी दरम्यान निफाड, सिन्नर,चांदवड, दिंडोरी व येवला या तालुक्यांतील खेळाडूंसाठी संस्थेच्या विविध कॅम्पस मध्ये कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, मल्लखांब, स्क्वॅश, बुद्धीबळ, व्हॉलीबॉल, रस्सीखेच व योगासने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभान नोंदवावा असे आवाहन संस्थेचे जनसंपर्क संचालक मा. अजिंक्य बाळासाहेब वाघ यांनी केले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ, संचालक मंडळ व सचिव प्रा. के. एस. बंदी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी. एम. शेजवळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम केले.
Comments are closed.