मुंबई/एनजीएन नेटवर्क
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांसाठी शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. टोलमाफीचे स्टीकर्स हे पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्यांमधून देण्यात येणार आहे.
आषाढी वारीसाठी पांढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकासाठी, वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांच्या वाहनाांना टोल माफ करण्याबाबत राज्य सरकारने 1 जून 2023 रोजी निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने आज सार्वजनिक बांधकाम विभागाने टोलमाफीबाबतचे आदेश जारी केले आहेत. गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स पुरवण्याचे निर्देश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक वारकऱ्याांना “आषाढी एकादशी 2023”, गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन आवश्यक त्या संख्येने नुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस / पोलीस, सांबांधीत आर.टी.ओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीस चौक्या, आरटीओमध्ये आजपासून अर्थात 13 जून पासून टोलमाफीचे स्टीकर्स उपलब्ध होणार आहेत.