NGN News
Latest Marathi News

लोहोणेरला वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे सोन्याचे डोरले लंपास

  • भरवस्तीत घडलेल्या घटनेने महिला वर्गात भीतीचे वातावरण; पोलिसात तक्रार दाखल

** पंडित पाठक

लोहोणेर : एनजीएन न्यूज नेटवर्क

लोहोणेर येथील भरवस्तीत राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्यांचे सोन्याचे डोरले अज्ञात चोरट्यांने भर दुपारी हिसकावून नेल्याने लोहोणेर गावांतील महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे पुढील तपास करीत आहेत.

याबाबत घडलेली घटना अशी की, लोहोणेर येथील कोळीवाडा परिसरात रहिवाशी असलेल्या सौ. विमलबाई हरिभाऊ भदाणे (वय ७९) हया वृद्ध महिला आपल्या घरातील गाळ्या मध्ये दुपारी जेवणा नंतर पलंगावर पहुडलेल्या असता दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे डोरले हिसकावून नेले मात्र गळ्यातील मंगळसूत्र खाली पडल्याने सापडली मात्र चोरट्यांने दीड तोळ्यांचे सोन्याचे डोरले घेऊन पोबारा केला.याबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विनय देवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत गावांतील सी सी टीव्ही तपासणी केली असता चोरट्यांने नवीन बाजार तळा कडून पोबारा केला असल्याचे सांगितले.

या घटनेमुळे लोहोणेर गावांतील महिला वर्गात घबराट निर्माण झाली असून पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विनय देवरे हे पुढील तपास करीत आहेत.

Comments are closed.