NGN News
Latest Marathi News

गोदरेज कॅपिटलच्या आरोहीचा बुकिंगमध्ये 1,000 कोटींचा टप्पा पार 

  • पदार्पणातच नाशिकमधून उत्तम प्रतिसाद
  •  552 कोटी रुपयांचा मालमत्ता आधार तयार केला तर 1,600 हून अधिक ग्राहक जोडले
  • कंपनी 2028 पर्यंत 10,000 हून अधिक ग्राहक जोडण्याच्या मार्गावर

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

 गोदरेज कॅपिटलचा महिला-केंद्रित उपक्रमआरोहीने ऑक्टोबर 2025 पर्यंत एकूण कर्ज बुकिंगमध्ये 1,116 कोटी रुपयांचा आकडा ओलांडल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. गोदरेज कॅपिटल ही गोदरेज इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये लाँच झाल्यापासूनआरोहीने 552 कोटी रुपयांचा मालमत्ता आधार तयार केला आहे आणि पहिल्याच वर्षात 1,600 हून अधिक ग्राहक जोडले आहेत. यात नाशिकचे योगदान प्रमुख आहे. ग्राहक संख्येनुसार या उपक्रमाने आधीच 10% प्रवेशाचे आर्थिक वर्ष 2026 चे लक्ष्य पूर्ण केले आहे. हे सुरुवातीच्या टप्प्यात मजबूत वाढ दर्शवते.

नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियाच्या (नीती आयोग) मते, राष्ट्रीय पातळीचा विचार करता महिलांनी घेतलेल्या कर्जांपैकी फक्त 3% कर्जे व्यवसायासाठी असतात. यामुळे त्यांच्या व्यावसायिक गरजांसाठी कर्ज प्रवाह मर्यादित दिसतो. मात्र, गोदरेज कॅपिटलचा आरोही उपक्रम महिलांसाठी अनुकूल क्रेडिट ऑफरिंग, कौशल्य-निर्मिती उपक्रम आणि सहकार्याच्या संधींद्वारे अधिक समावेशक आर्थिक परिसंस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतो. ग्राहक, चॅनेल भागीदार, सहकारी आणि सीएसआर अशा उपक्रमांद्वारे – चारही गटांमध्ये महिलांना सक्षम करून, आरोही त्यांचा सहभाग तर वाढवतेच पण व्यापक आर्थिक प्रभावाचे उद्दिष्ट ठेवते.

या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत गोदरेज कॅपिटलचे एमडी आणि सीईओ मनीष शाह म्हणालेभारताची आर्थिक क्षमतेचा पूर्णपणे लाभ घेण्यासाठी आपल्या क्रेडिट यंत्रणा अधिक समावेशकन्याय्य आणि जाणीवपूर्वक महिलांसाठी म्हणून डिझाइन केल्या पाहिजेत. वास्तविक विकासाला चालना देण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असूनहीआर्थिकदृष्ट्या महिलांना अनेक रचनात्मक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. आर्थिक यंत्रणांमध्ये विना अडथळा प्रवेशक्षमता विकसित होण्यासाठी योग्य समर्थन आणि त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सहभागाला बळकटी देणारा मंच देऊन ही दरी भरून काढणे हा आरोहीचा उद्देश आहे. जेव्हा महिला प्रगती करतातव्यवसाय वाढवतात तेव्हा समाजाची भरभराट होते. त्या गतीला चालना देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे आरोही हे प्रतीक आहे.”

गोदरेज कॅपिटलची उपकंपनी असलेल्या गोदरेज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा (जीएचएफएल) एकूण बुकिंगमध्ये 56% वाटा आहे. प्राइम होम लोन्सचे प्रमाण हे 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर गोदरेज कॅपिटलची उपकंपनी असलेल्या गोदरेज फायनान्स लिमिटेडने (जीएफएल) उर्वरित 44% वाटा उचलला आहे. ज्याला प्राइम एलएपी कडून 220 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे पाठबळ मिळाले आहे.

वैविध्यपूर्ण ग्राहक प्रोफाइलमध्ये आरोहीचा प्रसार झालेला आहे. प्राइम होम लोन अंतर्गत नोकरदार ग्राहक 36% आहेत आणि एकूण बुकिंग मूल्याच्या 50% वाटा त्यांचा आहे. तर व्यावसायिक कर्ज आणि एलएपी उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये महिला उद्योजकांचा वाटा 55% आहे.ग्राहक संख्या वाढवून पुढील दोन आर्थिक वर्षांत – आर्थिक वर्ष 26 मध्ये 10% वरून आर्थिक वर्ष 27मध्ये 16% आणि आर्थिक वर्ष 28 मध्ये 22% पर्यंत आरोहीचा प्रभाव मजबूत करण्याचे गोदरेज कॅपिटलचे उद्दिष्ट आहे. तर आर्थिक वर्ष 28 पर्यंत 10,000 हून अधिक ग्राहक जोडण्याचे लक्ष्य आहे.

Comments are closed.