NGN News
Latest Marathi News

गोदरेज कॅपिटलतर्फे नाशिकमध्ये हाऊसिंग फायनान्स उपकंपनी शाखा सुरू

  • ही शाखा इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, त्र्यंबक, ओझर, पिंपळगाव, चांदवड आणि आसपासच्या भागांना सेवा
  • विरार, पनवेल, पुणे पीसीएमसी, बदलापूर आणि इतर ठिकाणी असलेल्या शाखांच्या बरोबरीने काम करणार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

गोदरेज हाऊसिंग फायनान्स या कंपनीने नाशिकमध्ये नवीन ‘अॅफॉर्डेबल हाऊसिंग फायनान्स’ शाखा सुरू केली आहे. विरार, पनवेल, बडापूर आणि पुणे पीसीएमसी येथे नव्या शाखा उघडल्यानंतर कंपनीने नाशिकला शाखा सुरू केल्याने कंपनीचा महाराष्ट्रातील पाया अधिक मजबूत झाला आहे. गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा गोदरेज कॅपिटल या कंपनीची गोदरेज हाऊसिंग फायनान्स ही उपकंपनी आहे.

नाशिकच्या या शाखेमध्ये वेतनधारकांना आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना ५ लाखांपासून सुरू होणारी परवडणाऱ्या घरांसाठीची कर्जे देण्यात येतील. या कर्जांची मुदत ३० वर्षांपर्यंत असेल. इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, त्र्यंबक, ओझर, पिंपळगाव, चांदवा या गावांत आणि नाशिकच्या आसपासच्या सूक्ष्म बाजारपेठांमध्ये या शाखेच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. या भागांत अलीकडील काळात घरखरेदीला मोठी गती मिळाली आहे.

कमी व्यवहार होत असलेल्या सूक्ष्म बाजारांमध्ये परवडणाऱ्या घरांसाठीची कर्जे उपलब्ध करून देत यावीत, यासाठी कनेक्टर्स, बिल्डर्स आणि चॅनेल पार्टनर्स यांचे नेटवर्क अधिक बळकट करण्याचे कंपनीचे धोरण आहे.

गोदरेज हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मेहर्नोष टाटा म्हणाले, “नाशिक ही एक मोठी क्षमता असलेली बाजारपेठ आहे. येथे अनेकांना घर खरेदी करण्याची इच्छा आहे, पण औपचारिक कर्ज मिळवण्यात त्यांना अडचणी येतात. विशेषतः उत्पन्नाची कागदपत्रे ज्यांच्याकडे नाहीत किंवा अशी कागदपत्रे मर्यादित प्रमाणात आहेत, त्यांना आमच्या या नवीन शाखेद्वारे जलद, सुलभ आणि ग्राहक-केंद्रित उपायांद्वारे कर्जे आम्ही देऊ. आमच्या कारभाराचा विस्तार महाराष्ट्रभर व्हावा, यासाठी आम्ही सूक्ष्म बाजारपेठांमध्ये शिरकाव करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांची घरखरेदीची स्वप्ने साकार होऊ शकतील.”

मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या घरखरेदीदारांच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी नाशिक परिसरातील निवासी भागांमध्ये ही शाखा जाणीवपूर्वक स्थापन करण्यात आली आहे. विशेषतः प्रथम घर खरेदी करणाऱ्यांना तिचा लाभ घेता येईल. या भागात विकसीत होत असलेल्या पायाभूत सुविधांमुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे, नाशिकमध्ये औपचारिक स्वरुपाची कर्जे उपलब्ध करून देण्यास पुष्कळ वाव आहे. बांधकाम उद्योगाच्या अंदाजानुसार, नाशिकच्या परिसरातील ४८ टक्क्यांहून अधिक घरांची किंमत ५० लाखांपेक्षा कमी आहे. त्यामुळेच तेथे परवडणाऱ्या घरांना जास्त मागणी असणार आहे. नाशिकमध्ये रिअल
इस्टेट बाजारपेठ सध्या मोठ्या गतीने वाढू लागली आहे. परवडणाऱ्या घरांसाठीच्या कर्जांसाठी ही चांगली संधी आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात या जिल्ह्यात १.२९ लाखांहून अधिक मालमत्तांच्या नोंदी झाल्या.

२०२४मध्ये येथे ८ हजारांहून अधिक घरांची विक्री झाली. २०२३च्या तुलनेत ही २२ टक्के वाढ आहे. अधिकाधिक घरखरेदीदार महागड्या महानगरांपेक्षा नाशिककडे वळत आहेत, हे यातून दिसून येते. कंपनीचा अफॉर्डेबल हाऊसिंग फायनान्समधील एयूएम पहिल्या वर्षी (आर्थिक वर्ष २६) २४० कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २८पर्यंत २५०० कोटी रुपयांचा एयूएम गाठण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. गोदरेज हाऊसिंग फायनान्सतर्फे घरखरेदी सहजतेने करता यावी, यासाठी कमी दस्तऐवज, जलद मंजुरी, आणि सोपा डिजिटल इंटरफेस अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. ग्राहकांना अतिशय आनंदाचा अनुभव मिळावा, याकरीता कंपनीने प्रतिष्ठित विकसकांसोबत पूर्व मंजूर प्रकल्पांसाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. यामुळे संभाव्य घरखरेदीदारांसाठीची कर्जप्रक्रिया अधिक सोपी आणि कार्यक्षम होईल.

Comments are closed.