NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटतर्फे शेतकऱ्यांना मदत करण्याची बांधिलकी आणखी दृढ

0

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेड या भारतातील आघाडीच्या वैविध्यपूर्ण शेती- व्यवसाय कंपनीने किसान दिवस २०२४ च्या निमित्ताने एका ब्रँड फिल्मचे अनावरण केले आहे. #SeedsofGoodness असे नाव असलेल्या या फिल्ममध्ये कंपनीची सातत्याने बदलणारे हवामान आणि शेतीच्या परिस्थितीत आपल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहाण्याची बांधिलकी अधोरेखित करण्यात आली आहे.

गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या कॉर्पोरेट ब्रँड आणि कम्युनिकेशन्स टीमने क्रिएटिव्हलँड एशियाच्या सहकार्याने या फिल्मची संकल्पना व अमलबजावणी केली असून त्यामध्ये गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटद्वारे शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्यक्ष राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम दाखवण्यात आले आहे.

व्हिडिओ पाहाण्यासाठी : https://www.youtube.com/watch?v=cyVJEDAXO8k

या फिल्मविषयी गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लि. चे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंग यादव म्हणाले, ‘आज वाढते तापमान आणि अनिश्चित हवामानामुळे तसेच हंगामी व दीर्घकाळ सुरू राहाणाऱ्या पावसामुळे शेतीचे उत्पादन व पर्यायाने आपल्या देशाचे पोट भरणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे अंदाज वर्तवणे व शेतीच्या पद्धतींमध्ये आधुनिकता आणणे शक्य झाले आहे. गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे सच्चे साथीदार बनून सातत्याने नाविन्य निर्मिती करत असतो. त्यांना सर्वसमावेशक पाठिंबा आणि सुधारणा पुरवून आम्ही या आव्हानांवर मात करण्यासाठी मदत करतो. या किसान दिवसाच्या निमित्ताने आमच्या सर्व कंपनीच्या वतीने मी देशातील शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याची बांधिलकी अधोरेखित करतो.’

कार्यकारी संचालक बुरिजिस गोदरेज यांनी कंपनीचे शेतकऱ्यांना शाश्वत पद्धतींच्या मदतीने सक्षम करण्याचे गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटचे मुख्य ध्येय असल्याचे सांगितले. राजावेलु के. ए., सीईओ- पीक संरक्षण व्यवसाय यांनी कीटक व तणांमुळे वाढत असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना तयार करण्यावर कंपनीचा भर असल्याचे नमूद केले. कॅप्टन ए. वाय. राजेंद्र, सीईओ – अ‍ॅनिमल फीड आणि गोदरेज मॅक्सीमिल्क यांनी पशुखाद्याचा दर्जा चांगला असल्यास त्याचा पशुंचे आरोग्य व शेतकऱ्याच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे सांगितले. दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी पशुंच्या आरोग्याशी तडजोड न करता जनुकीय सुधारणा करण्याचे महत्त्व त्यांनी नमूद केले. भूपेंद्र सुरी, सीईओ- गोदरेज जर्सी यांनी दुध उत्पादन वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली, तर अभय पर्णेकर- सीईओ – गोदरेज फुड्स यांनी मातीची चाचणी आणि जलसिंचन यंत्रणा शाश्वत आणि यशस्वी तेल पाम लागवडीसाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले. ध्रुबज्योती बॅनर्जी, सीईओ, अ‍ॅक्वा फीड्स यांनी मत्स्यपालन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेषतः कडाक्याच्या थंडीत तपशीलवार उपाययोजना राबवल्या जात असल्याचे नमूद केले.

क्रिएटिव्ह एशियाच्या सह- संस्थापक आणि क्रिएटिव्ह उपाध्यक्ष अनु जोसेफ म्हणाल्या, ‘ही फिल्म भारतीय शेतकऱ्यांच्या चिकाटीला आदरांजली वाहाणारी आणि त्यांन हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी मदत करण्याची गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटची बांधिलकी दर्शवणारी आहे. #SeedsOfGoodness साठी यामध्ये गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट आणि किसान यांच्यातील भागिदारी अधोरेखित करण्यात आली असून त्यातून शेतकऱ्यांना शाश्वत व सुरक्षित भविष्य मिळवून दिले जाणार आहे. गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटच्या लीडर्सचा दृष्टीकोन प्रत्यक्षात आणण्याची कल्पना त्यामागे आहे. ’

गोदरेज इंडस्ट्रीज समूह शेतकरी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. १९९१ पासून गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटची टीम आपल्या देशाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करण्यात आघाडीवर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.