NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

गोदरेज अ‍ॅग्रोवेटतर्फे ICAR-CIFE च्या सहकार्याने फिश लाईस कंट्रोलर अर्गो रिड सादर

0

गोदरेज अ‍ॅग्रोवेट लिमिटेड (गोदरेज अ‍ॅग्रोवेट) ने आज अर्गो रिड हे फिश लाईस कंट्रोलर सादर करत असल्याची घोषणा केली. इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च (ICAR) – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (CIFE) यांच्या सहकार्याने विकसित केलेले हे उत्पादन माशांच्या आरोग्याचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. यामुळे परजीवी संलग्नता म्हणजेच पॅरॅसाईट अॅटॅचमेंटमुळे (Argulus Spot) माशांवर होणाऱ्या जखमा भरून येण्यास मदत होते आणि माशांच्या प्रतिकारशक्तीला चालना मिळते.

अर्गुलस संसर्गाने दीर्घकाळापासून मत्स्यपालन क्षेत्राला त्रास दिला आहे. भारतातील सुमारे 48% मत्स्यपालन तलाव यामुळे प्रभावित झाले असून दरवर्षी सुमारे 62.5 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे 1 नुकसान होते. अर्गो रिडच्या सोप्या व मत्स्यपालन शेतकरी अनुकूल फॉर्म्युलेशनद्वारे लहान व मोठ्या व्यावसायिक शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येतो. मत्स्यशेतकरी हे उत्पादन त्यांच्या सध्याच्या फीडिंग पद्धतींमध्ये सहज समाविष्ट करू शकतात.

या सादरीकरणाबद्दल बोलताना गोदरेज अ‍ॅग्रोवेटचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंग यादव म्हणाले, “गोदरेज अ‍ॅग्रोवेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या आणि शाश्वततेला प्रोत्साहन देत शेती करणाऱ्या कुटुंबाचे जीवनमान उंचावणाऱ्या संशोधनाधारित उपायांची निर्मिती करण्यासाठी वचनबद्ध आहोत. देशाच्या ब्लू रेव्होल्यूशनमध्ये योगदान देण्याच्या आमच्या प्रयत्नांत आम्हाला या क्षेत्रातील सर्वाधिक मोठ्या आव्हानांपैकी एक असलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वसनीय, सोपे आणि प्रभावी साधन देत सक्षम करण्याचा आनंद आहे. ICAR-CIFE च्या तांत्रिक कौशल्याचा फायदा घेत आणि आमच्या वितरण पोहोचद्वारे, आम्हाला विश्वास आहे की अशा सार्वजनिक-खाजगी भागीदारी उद्योगक्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती साधण्यास मदत करतील आणि जागतिक स्तरावर भारताच्या मत्स्यपालन क्षेत्राचे स्थान मजबूत करतील.”

ICAR-CIFE चे शास्त्रज्ञ डॉ. मोहम्मद अकलकूर यांनी देखील या उत्पादनाबाबत आपले विचार मांडले. “अर्गो रिडचे सादरीकरण शास्त्रीय दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण यामुळे न्यूट्रास्यूटिकल्सचा उपयोग माशांवरील फिश लाईस प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकतो हे सिद्ध होते. याचे फॉर्म्युलेशन फक्त फिश लाईसचा नाश करत नाही तर यामुळे माशांची प्रतिकारशक्ती सुधारते, जखम भरून निघते आणि माशांचे एकूण आरोग्य सुधारते. ICAR-CIFE येथे विस्तृत संशोधनाद्वारे विकसित केलेले अर्गो रिड हे उद्योगातील प्रमुख आव्हानांसाठी एक प्रभावी आणि विस्तारयोग्य उपाय आहे.”

गोदरेज अ‍ॅग्रोवेट लि. च्या अ‍ॅक्वाफीड बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुबज्योती बॅनर्जी म्हणाले, “भारत हा जागतिक मासे उत्पादनामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि एकूण उत्पादनात 8% योगदान देतो. अंतर्गत मत्स्यपालन क्षेत्राचे यात मुख्य योगदान असून त्यांनी 2.36 MN Ha तलाव क्षेत्रासह 2 प्रचंड वाढ नोंदवली आहे. परंतु तरीही उत्पादकता सुधारण्यासाठी अद्याप मोठी क्षमता आहे. 3 पोषण सुरक्षा, परकीय चलन उत्पन्न आणि रोजगार निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या क्षेत्रासाठी, अर्गो रिड एक महत्त्वपूर्ण नवकल्पना सादर करते. माशांचा जीवनदर सुधारत आणि उत्पादकतेला चालना देत भारताच्या मत्स्यपालन क्षेत्राला बळकटी देण्यास आणि मत्स्यपालन शेतकऱ्याला दीर्घकालीन आर्थिक फायदे देण्यास याची मदत होते.”

अर्गो रिड शेतात तयार केलेल्या किंवा व्यावसायिक खाद्यामध्ये प्रति 100 किलोग्रॅम खाद्यासाठी 3 किलोग्रॅम अशा शिफारस केलेल्या डोसप्रमाणे एकसंधपणे मिसळले पाहिजे. खाद्य देण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन दिवसांची प्रारंभिक मालिका, त्यानंतर सातव्या दिवशी डोस आणि संसर्ग टिकून राहिल्यास 15 दिवसांच्या अंतराने दोन अतिरिक्त उपाययोजन यांचा समावेश आहे. औषध चांगल्या प्रकारे शोषून घेतले जावे आणि त्याची परिणामकता जास्तीत जास्त वाढावी यासाठी हे खाद्य स्वच्छ, सूर्यप्रकाशी दिवसांत दिले पाहिजे.

तांत्रिक प्रगतीला प्रत्यक्षातील परिस्थितीशी जोडून, गोदरेज अ‍ॅग्रोवेटच्या अ‍ॅक्वा फीड व्यवसायाने वैज्ञानिक मत्स्यपालनातील महत्त्वाच्या कमतरता दूर करण्यासाठी एक पूरक प्रणाली तयार केली आहे. ऋतुनिहाय उत्पादनातील आव्हानांचे व्यवस्थापन कसे करावे यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असलेली एक व्यापक प्रणाली विकसित करत, कंपनी शेतकऱ्यांना सक्षम बनवून आणि शाश्वत पद्धतींच्या माध्यमातून एक मजबूत मत्स्यपालन क्षेत्र उभारण्यासाठी वचनबद्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.