NGN News
Latest Marathi News

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटतर्फे मका पिकासाठी ‘आशिताका’ तणनाशक सादर

ISK जपानच्या सहकार्याने गवत आणि रुंदपर्णी तण नियंत्रणासाठीचा नाविन्यपूर्ण उपाय

मुंबई/हैदराबाद : एनजीएन न्यूज नेटवर्क

भारतातील अग्रगण्य वैविध्यपूर्ण कृषी-व्यवसायांपैकी एक असलेल्या गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेड (गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट) ने मका पिकांसाठी खास तयार केलेले नवीन तणनाशक सादर केले आहे. ‘आशिताका’ हा ISK जपानच्या सहकार्याने विकसित केलेला एक अभिनव उपाय असून भारतातील मका शेतकऱ्यांसमोर उभ्या राहणाऱ्या मोठ्या अडचणींपैकी एक असलेल्या गवत व रुंदपर्णी तणांवर प्रभावी नियंत्रण पुरवितो. पिकाच्या प्रारंभीच्या वाढीच्या टप्प्यातील तणांचा प्रादुर्भाव मका उत्पादनावर मोठा परिणाम करतो. 2 – 4 तणाच्या पानांच्या अवस्थेत अवलंब केल्यास ‘आशिताका’ मुळे प्रभावी तण नियंत्रण मिळते.

जागतिक स्तरावर, मका लागवडीच्या क्षेत्रफळात भारत 4 थ्या क्रमांकावर आणि वार्षिक उत्पादनात 5 व्या क्रमांकावर आहे. 1 देशातील वाढती अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्गाचा विस्तार यामुळे प्राणिजन्य प्रथिनं, स्टार्च व मका वापरणाऱ्या इतर औद्योगिक उत्पादनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात जनावरांच्या खाद्यासाठी, औद्योगिक व जैवइंधन वापरासाठी मक्याची मागणी वाढली आहे. मात्र या क्षेत्राला दर्जेदार बियाणे व कृषी-उपकरणांची मर्यादित उपलब्धता यासारख्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान बदल हे आणखी एक मोठे आव्हान असून अतिवृष्टी, बदलत्या पावसाचे स्वरूप, किडी व रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मका उत्पादनात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे उत्पादनक्षमता वाढविण्यास आणि या पिकाचे महत्त्व टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी ‘आशिताका’सारखे संशोधनाधारित उपाय आणणे अत्यावश्यक ठरते.

या सादरीकरणाबद्दल बोलताना गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटच्या क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजवेलु एन.के म्हणाले, “गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटमध्ये भारतीय शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या संशोधनाधारित, नाविन्यपूर्ण उपायसुविधा पुरवणे आणि पर्यावरण व बाजारपेठेतील आव्हानांना तोंड देण्यासाठी शेतकरी कुटुंबांना भविष्याभिमुख करणे हे आमचे ध्येय आहे. मका पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रभावी तण नियंत्रण मिळणे हे उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचे आहे. भारतात प्रथमच सादर होणारे ‘आशिताका’ हे शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यास व नफ्यात वाढ करण्यासाठी एक प्रभावी साधन ठरेल.”

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटच्या क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसचे मार्केटिंगचे सरव्यवस्थापक अनिल चौबे म्हणाले, “मक्यामधील ‘आशिताका’चे प्रभावी तण नियंत्रण पिक-तण दर कमी करते. त्यामुळे मर्यादित मातीतील ओलावा व पोषणघटकांचा चांगला वापर होतो आणि फुलोरा व दाणे भरण्याच्या टप्प्यात पिकाच्या आरोग्यास मदत मिळते. शिफारस केलेला डोस – 50 ml/acre सोबत 400 ml/acre सर्फॅक्टंट असा 2 – 4 तण पानांच्या अवस्थेत दिल्यास तणांचे लवकर नियंत्रण होते आणि तणामुळे होणारे उत्पादनातील नुकसानही कमी होते. हवामानाचा फटका बसल्यास हे नुकसान वाढते. यामुळे अधिक सातत्यपूर्ण उत्पादन, चांगल्या प्रतीचे दाणे आणि विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या भागात उत्पन्नातील चढउतारावरील संरक्षण मिळते.”

सुरुवातीला तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या प्रमुख मका उत्पादक भागांत सादर केल्यानंतर गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट ‘आशिताका’ आता लवकरच आगामी महिन्यात सर्व मका पिकविणाऱ्या राज्यांत उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे.

Comments are closed.