नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
गोदामाई प्रतिष्ठान नाशिक आणि सिम्बायोसिस कॉलेज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी ( दि. १ ) “नाशिक गोदावरी स्वच्छता अभियान चा १७५ वा आठवडा साजरा करण्यात आला. सकाळी 7.00 वाजता तब्बल 45 ते 50 गोदामाई सेवक आणि युवक यांच्या उपस्थितीत आई गोदावरी नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली. या अभियाना दरम्यान मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, निर्माल्य, देवी देवतांचे फोटो, आणि असंख्य कचरा गोळा करण्यात आला..
यावेळी सर्वच गोदामाई सेवकांनी नदीपात्रात उतरून आणि तसेच गोदा काठावर देखील स्वच्छता केली. अभियाना दरम्यान गोदामाई प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष आदिनाथ जी ढाकणे, गोदामाई प्रतिष्ठान नाशिक जिल्हा कार्यध्यक्षा कु. सृष्टी देव, तसेच चंदू पाटील, गोदामाई सेवक आबासाहेब देव, रतन काळे, गौरी देव, आनंद काळे, सिम्बायोसिस कॉलेजचे पदाधिकारी रामनाथ जाधव आणि जवळपास 50 गोदामाई सेवकांची उपस्थिती असताना स्वच्छता अभियानाचा 175 वा आठवडा संपन्न झाला.
कार्यमाच्या शेवटी माझ्याकडून नदी प्रदूषण होणार नाही यासाठी विशेष प्रतिज्ञा सृष्टी देव यांनी घेतली व गोदावरी नदी पात्र स्वच्छ कसे राहील, यासाठी उपाययोजना आणि जनजागृती करण्यात आली.
Comments are closed.