पुणे/एनजीएन नेटवर्क
परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैशाची मागणी करत असल्याचा खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे उकळवत असल्याचे दिसत आहे. मार्कशीटसाठी चार हजार रुपये मागितल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी अभाविपकडे केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्याचे ठरवले. त्यानंतर नोटांचे नंबर नोंद केले गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्याला त्याच नोटांसह पकडले. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. परीक्षा विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी माहणी अभाविपकडून करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.