NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

गिरीश पालवे नाशिक लोकसभा, सहा विधानसभा क्षेत्रांचे समन्वयक 

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

नाशिक जिल्हा ग्रामीण तसेच नाशिक महानगर शहराध्यक्ष यशस्वी कार्यकर्त्यानंतर गिरीश पालवे यांची नाशिक लोकसभा व त्या अंतर्गत सहा विधानसभा क्षेत्रांचे समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्राद्वारे त्यांची निवड करण्यात आल्याचे घोषित केले आहे. त्यांचा भारतीय जनता पार्टीतील संघटनात्मक अनुभव बघता त्यांची  ही निवड झाली आहे 

या निवडीबद्दल पालवे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उत्तर महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व गिरीश महाजन ,उत्तर महाराष्ट्र प्रभारी व प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, महाराष्ट्र प्रदेश  मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे यांचे त्यांनी आभार मानले आहे. नाशिक महानगर भाजप कार्यालयात त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव व प्रदेश  प्रवक्ते लक्ष्मण सावजी व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.

          दरम्यान, पालवे यांच्या निवडीबद्दल केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, नाशिक नाशिक शहर भाजपा अध्यक्ष प्रशांत जाधव,जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुनील बच्छाव, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आ. सीमा हिरे,आ. देवयानी फरांदे , आ. राहुल ढिकले, नाशिक लोकसभा निवडणूक प्रमुख केदा आहेर,दिंडोरी  लोकसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब सानप, नाशिक महानगर व जिल्हा प्रभारी राजेंद्र गावित,भाजप ज्येष्ठ नेते विजय साने, प्रदेश मुख्य सह प्रवक्ते अजित चव्हाण प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे व प्रवीण आलई  पवन भगूरकर, सुनील केदार, जगन पाटील , सुनील देसाई, कुणाल वाघ, माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी महापौर रंजना भानसी, काशिनाथ शिलेदार,प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष गणेश कांबळे,महिला मोर्चा अध्यक्ष हिमगौरी आडके, हर्षा फिरोदिया उगावकर,अरुण शेंदुर्णीकर, दिगंबर धुमाळ,युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे  संतोष नेरे, सतीश निकम ,वसंत उशीर ,हेमंत शुक्ल , सोमनाथ बोडके आदींसह प्रदेश पदाधिकारी नाशिक महानगरातील विविध मोर्चा व आघाड्यांचे पदाधिकारी तसेच नाशिक महानगरातील व नाशिक ग्रामीणचे पदाधिकारी यांनी सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.