शहापूर/एनजीएन नेटवर्क
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे इथे पुलाचे काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळली . यामध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेच दिली. गर्डर मशिनखाली दाबले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्रथम प्राधान्य देत आहोत. ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल. तसेच मतृांच्या कुटुंबीयांना मदत देखील केली जाईल असे दादा भुसे म्हणाले.
प्राप्त माहितीनुसार, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडली आहे. शहापूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे.गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. यामध्ये 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.