इगतपुरी/एनजीएन नेटवर्क
घोटी येथील एका तरुणाने दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट टाकल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित तरूणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, घोटीमधील एका तरुणाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली. पोलिसांच्या निदर्शनास येतात, पोलीस कर्मचाऱ्यांनी फिर्याद दाखल करत घोटी पोलीस ठाण्यास संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावरुन काही काळ घोटी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घोटी पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची मोठी गर्दी केली होती. मात्र घोटी आणि इगतपुरी पोलिसांनी कुठल्याही अनुसूचित प्रकार होऊ न देता परिस्थिती नियंत्रणात ठेवले