घोटी : राहुल सुराणा
पावर लिफ्टिंग या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्वल करणाऱ्या तालुक्यातील रहिवासी हर्ष प्रमोद कुमार व्यास यांच्या दिमागदार कामगिरीने दोन सुवर्णपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यानिमित्ताने हर्ष याचा सन्मान व सत्कार सोहळा जनसेवा पतसंस्था घोटीच्या वतीने करण्यात आला.
तालुक्यातील सहकार क्षेत्रातील प्रगतशील असलेल्या घोटी शहरातील जनसेवा पतसंस्था ही नेहमीच चेअरमन तुषार बोथरा यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवित असते त्याच अनुषंगाने आर्थिक प्रगती साधताना सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, धार्मिक स्तरावरती विविध कार्यक्रम घेत असताना तालुक्यातील भूमिपुत्र हर्ष व्यास याचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
व्हिएतनाम येथे झालेल्या एशियन पावर लिफ्टिंग स्पर्धेत हर्ष व्यास याने दोन सुवर्णपदके पटकावत भारताचे नाव रोशन केले तसेच अमेरिकेत झालेल्या युएसए पावर लिफ्टिंग अँड ज्युनियर चॅम्पियन ऑफ स्ट्रेंथ या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याने ज्युनिअर पुरुष रॉ या गटामध्ये ब्रांच पथक पटकाविले. त्याच्या या यशाबद्दल घोटी येथील जनसेवा पतसंस्थेच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन तुषार बोथरा संचालक राजेंद्र वालतुले , विठ्ठल काळे, पारस राखेचा , ज्ञानेश्वर बुधवारे, शरद हांडे व व्यवस्थापक संदीप आंबेकर आदी कर्मचारी यांनी हर्ष याचा सन्मान व सत्कार केला.
याप्रसंगी हर्ष चे वडील प्रमोद कुमार व्यास, व्यापारी प्रवीण चोपडा, अभय बोथरा, पिंटू बेदमुथा आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
बँकेची प्रगती साधण्याचा मानस
बँकेची आर्थिक प्रगती साधताना सर्वच स्तरावर चेअरमन तुषार बोथरा यांचे कार्य सर्वोत्कृष्ट असून याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय स्तरावर इगतपुरी तालुक्याचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिणाऱ्या हर्ष याचा सत्कार आयोजित केला होता. याच बरोबर आपल्या कार्य काळात विविध कार्यक्रमासोबत बँकेची प्रगती साधताना करण्याचा मानस बोथरा यांनी व्यक्त केला.
Comments are closed.