नाशिक/एनजीएन नेटवर्क
सुप्रसिद्ध कवी, गझलकार अजय बिरारी यांच्या ‘गझलस्पंदन’ संग्रहाचे प्रकाशन येत्या रविवारी (दि. ६) रोजी संध्याकाळी पाच वाजता औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून हास्यकवी मिर्झा रफि बेग (झी मराठी हास्यसम्राट फेम मिर्झा एक्स्प्रेस), आमदार सीमाताई हिरे, विश्वास ठाकूर (चेअरमन विश्वास ग्रुप), प्रशांत वैद्य (सुप्रसिद्ध गझलकार), प्रकाश होळकर (सुप्रसिद्ध साहित्यिक), भीमाबाई जोंधळे (पुस्तकांचं हॉटेल), अरुण नेवासकर (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अलुतेदार बलुतेदार महासंघ), श्रीकांत बेणी (अध्यक्ष वसंत व्याख्यानमाला), तानाजी खोडे (ज्ञानसिंधू प्रकाशन) आणि रेखामाई खरोटे, पिंपळनेर हे उपस्थित राहणार आहेत. हास्यकवी मिर्झा बेग यांचाही एक तासाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गझलकार अजय बिरारी यांनी केले आहे .