विंचूर : मच्छिंद्र साळुंके
लासलगाव पोलिसांनी गांजाच्या अवैध तस्करीवर मोठा घाव घालत दोन संशयितांना अटक करून तब्बल ₹२,१०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घटना अशी घडली :
दि.२ सप्टेंबर रोजी रात्री ११.४७ वाजता पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर भरवस फाटा येथे सापळा रचण्यात आला. यावेळी MH 04 EN 8811 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर गाडीने, एका दुचाकीस MH.15 .GH.5347 मागून धडक दिली असता, ती स्विफ्ट कार अडवून तपासणी केली असता, त्यामधून ९८५ ग्रॅम गांजा (किंमत ₹५,०००), दोन मोबाईल हँडसेट, रोख रक्कम यांसह एकूण ₹२,१०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपी या प्रकरणी सलीम कामूद्दीन पिंजारी, राजू हाजी अहमद पिंजारी हे (दोघेही रा. पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक) यांच्यावर भादंवि कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४), १३४, १७७ तसेच एन.डी.पी.एस. कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल – स्विफ्ट डिझायर कार (MH 04 EN 8811), दोन मोबाईल हँडसेट, रोख रक्कम, ९८५ ग्रॅम गांजा, एकूण किंमत – ₹२,१०,००० या कारवाईमुळे परिसरातील अवैध गांजा तस्करीला मोठा आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून, लासलगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील करीत असून, लासलगाव पोलिसांच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments are closed.