नाशिक/एनजीएन नेटवर्क
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा 87 टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ 13 टक्क्यांनी अधिक आहे. नाशिक शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तूर्तास सुटला असला तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर, पालखेड, पुणेगाव, केळझर, कडवा या धरणात चांगला जलसाठा निर्माण झाला आहे. घोटी, इगतपुरी तालुक्यात सातत्याने पाऊस सुरू असल्याने दारणा धरण समूहाच्या धरण साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जोरदार पावसामुळे भावली पाठोपाठ इतरही धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. मात्र, उर्वरित ठिकाणी असलेल्या धरणांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कश्यपी धरणात 52 , गौतमी धरणात 54 , पालखेड धरण 71, पुणेगाव धरणात 92, दारणा धरणामध्ये 93 आणि भावली 100 टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.