NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

एआय-आधारित ऊस तोडणीसाठी गंगामाई इंडस्ट्रीज-महिंद्रा भागीदारी

0

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राच्या सहकार्याने ऊस तोडणी नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा गंगामाई साखर कारखाना हा महाराष्ट्रातील पहिलाच खासगी साखर कारखाना ठरला आहे. हे साखर उद्योगामधील AI च्या वापराचे महत्वपूर्ण यश होय. जगातील उपलब्ध प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.

भारतातील साखर उद्योगात शाश्वत शेती पद्धतींसाठी ही भागीदारी एक बेंचमार्क स्थापित करताना शेतकऱ्यांना चांगली उत्पादकता आणि नफा मिळवण्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा वापर महत्वपूर्ण ठरणार आहे. महिंद्रा अँड महिंद्राने ऊस पिकाचे निरीक्षण तसेच विश्लेषणासाठी अत्याधुनिक उपग्रह प्रणाली आणि एआय मॉडेल चा वापर करून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तज्ज्ञांच्या टीमने गंगामाई
कारखान्याला सहकार्य केले.

रिमोट सेन्सिंग पद्धती मध्ये सॅटेलाईट मधील मल्टीस्पेक्ट्रम बँड्स च्या मदतीने ऊस पिकाचे व्हेजीटेशन इंडेक्स चे हवामान घटकांसोबत पृथक्करण करून शेतामध्ये उभ्या असलेल्या ऊसाची साखर उतारा तपासणी केली जाते. ह्या सर्व माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्तेचे मॉडेल वापरून पृथक्करण केले जाते आणि प्रत्येक आठवड्याला ह्यात आलेले निष्कर्ष साखर कारखान्याच्या लॅब मध्ये देखील फेर पडताळणी केली जाते. ह्यात आलेले निष्कर्ष ह्या वर्षी ९५ टक्के पेक्षा अचूक असल्याचे आढळून आले. आणि त्यामुळे ह्या आधारित तोडणी प्रोग्रॅम राबवल्याने खर्चात बचत होऊन, एकूण ०.५ अधिक साखर उतारा मिळाला. तसेच प्रायोगिक तत्वावर १५०० शेतकऱ्यांच्या प्लॉट चे सॅटेलाईटद्वारा आलेल्या जैविक आणि अजैविक ताणाचे देखील निरीक्षण केले गेले आणि त्यात देखील अत्यंत समाधानकारक निकाल आले आहेत. ह्याचा उपयोग करून शेतावर आलेल्या कीड रोगांची माहिती तसेच पाण्याचाही ताणाचे सॅटेलाईट मधून पृथक्करण करून देण्यात आले. उत्त्पादन वाढीसाठी कोणत्या शेतकऱ्यांचे शेतातील पीक जैविक अथवा अजैविक ताणावर आहे हे समजण्यास मदत होऊन त्या शेतावर योग्य ते मार्गदर्शन देण्यात आले.

 एआय- आधारित कापणी नियोजन: महाराष्ट्रातील खासगी साखर क्षेत्रातील अशा प्रकारचा पहिलाच
उपक्रम.
 एकूण गाळप: 10% पेक्षा जास्त साखर उताऱ्यासह 8,80,975 मेट्रिक टन ऊसाचे गाळप.
 सुधारित साखर उतारा: गेल्या वर्षीच्या कामगिरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ.
 उपग्रह-आधारित देखरेख: चांगल्या पीक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना कीट आणि रोगांबद्दल लवकर
सूचना देणे शक्य.

Leave A Reply

Your email address will not be published.