NGN News
Latest Marathi News

एमडी पावडर विक्रेत्या टोळीचा पर्दाफाश; महिलेसह तिघे ताब्यात

द्वारका परिसरातील हॉटेल स्वागत येथे छापा; भद्रकाली पोलिसांची कारवाई

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

शहरात सातत्याने चर्चेत असलेला एमडी ड्रग्ज मुद्दा अलीकडे सार्वत्रिक चिंतेचा विषय बनत असतानाच द्वारका परिसरातील एका हॉटेलमधून तीस ग्रॅम एमडी पावडरसह तिघांना रंगेहाथ पकडल्याचा प्रकार मंगळवारी उघड झाला. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. या तिघांकडून सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यावर भद्रकाली पोलिसांनी द्वारका परिसरातील हॉटेल स्वागत येथे छापा टाकण्यात आला. सध्या वेशातील पोलिसांनी फरहान शेख ( रा. बागवानपुरा ), अनिल वर्मा ( रा. तपोवन रोड ) आणि हीना कापसे ( रा. निलगिरी बाग ) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तीस ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. याशिवाय त्यांच्याकडून मोटारगाडी आणि मोबाईल जप्त करण्यात आला. एकूण सतरा लाखांचा मुद्देमाल यावेळी हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी दिली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

Comments are closed.