NGN News
Latest Marathi News

घोटी शहरात उत्साहात गणेश विसर्जन; दिवसभर पावसाची रिपरिप  

घोटी : राहुल सुराणा

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या‘, अशा जोरदार घोषणा, ढोल-ताशांचा गजर वर लयबद्ध ठेका धरत गणेशभक्तांनी शनिवारी बाजाराच्या दिवशी घोटी नगरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवाच्या गणपतीला  निरोप दिला. विशेष म्हणजे यावर्षी रेकॉर्डब्रेक पाऊस झाला, तसेच आज दिवसभर पावसाची संततधार असल्याने गणरायाला निरोप देण्यासाठी भर पावसात भक्ताचा उत्साह अमाप होता.  यावेळीही  दारणा नदीला मुबलक पाणी असल्याने  गणेश विसर्जन स्थळीही भाविकांची तारांबळ उडाली होती.सकाळी दहा वाजेपासून सुरु असलेला गणेश विसर्जन सोहळा संध्याकाळ उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरु होता.

घोटी नगरीत सकाळी १० वाजे पासून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची तयारी व सुरवात झाली होती दिवस भर भर पावसात आबाल, वृद्ध, युवक भगिनी नाचत बागडत गणरायाला निरोप देण्यासाठी भक्ती मय वातावरणात गणपती बाप्पाचे विसर्जन करत होते . काही भक्तांनी पायी पायी तर काहींनी दुचाकी , तीनचाकी अथवा चारचाकी वाहनावर अथवा हात गाड्यावर श्री गणरायास निरोप देण्यासाठी दारणा नदीच्या किना-यावर मार्गक्रमण केले.  घोटी येथे मुख्यतः दुपारनंतर गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला उत्साहामध्ये निरोप दिला , शहरामध्ये  दुपारी चार नंतर सार्वजनिक गणेशोत्सवातील गणरायांची विसर्जन मिरवणूक  सुरू होती .  मिरवणुकीमध्ये सहभागी लहान मुलांपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत साऱ्यांचा उत्साह मिरवणुकीत रंगत आणत होता. या मिरवणुकीमध्ये गुलालाची तसेच भंडारा ची उधळण करीत सहभागी झालेले गणेशभक्त “गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या ‘ अशा जोरदार घोषणा देत होते. त्यामुळे शहर परिसर दणाणून गेला होता. अद्यावत संगीत च्या तालावर सर्व वयोगटातील भाविकांनी ठेका धरला होता , उत्साहाच्या वातावरणात गणपती बाप्पा पुढील वर्षी लवकर या या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.     

     यावेळी पोलिस यंत्रणेने नियोजन समयोचित केले होते. शहरात,मिरवणूक मार्गावर ,नदीवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते.  पोलिस निरीक्षक विजय शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीत मिरवणूक व विसर्जन ठिकाणी नियंत्रण ठेऊन होते. घोटी- सिन्नर महामार्गावर दारणा नदीपात्रात मूर्ति विसर्जन करण्यात आले. तसेच कैलास धाम येथे व घोटी टाके येथील वाकी खापरी नदीत गणेश विसर्जन करण्यात आले. 

—————-
बाप्पाच्या विसर्जनाच्या निमित्ताने दिवसभर पोलिसांनी वाहतूक नियंत्रित ठेवली होती. अशीच शहरातील वाहतूक नेहमी नियंत्रित राहो, अशी मागणी घोटीच्या नागरिकांनी बाप्पाकडे केली.       

Comments are closed.