NGN News
Latest Marathi News

जिल्हा परिषद आरोग्य पतसंस्था चेअरमनपदी जी. पी. खैरनार बिनविरोध

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिक या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जी.पी.खैरनार, उपाध्यक्षपदी तुषार पगारे व सचिवपदी राजेंद्र सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली.

पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुलोचना भामरे, उपाध्यक्ष प्रशांत रोकडे व सचिव वर्षा सपकाळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर नव्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव ही निवड प्रक्रिया पार पडली. आरोग्य पतसंस्थेच्या नुतन पदाधिकारी निवड प्रसंगी संचालक सर्वश्री मधुकर आढाव, विजय देवरे, सुलोचना भामरे, जयंत सूर्यवंशी, संजय पगार, प्रशांत रोकडे, श्रीकांत अहिरे – पाटील, अब्दुल वहाब शेख, एकनाथ वाणी, मनोज महाले, सोनाली तुसे, वर्षा सपकाळे व व्यवस्थापक रामदास वडनेरे उपस्थित होते.


@ आरोग्य पतसंस्थेच्या नवीन सभासद वाढीसाठी प्रयत्न करुन जास्तीत जास्त आरोग्य कर्मचारी यांना नियमित वर्गणीदार सभासद करुन घेण्यावर भर देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना हक्काच्या आर्थिक वाहिनीच्या प्रवाहात सामावुन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच नाशिक जिल्हा परिषद कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित होणार असल्याने त्या ठिकाणी जवळपास आरोग्य पतसंस्थेच्या स्वमालकीचे अतिरिक्त कार्यालय खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
* जी.पी.खैरनार – अध्यक्ष

Comments are closed.