लासलगाव : राकेश बोरा
भारतीय ताज्या फळांना परदेशात वाढती मागणी असून, एप्रिल २५ ते मे २५ या दोन महिन्यांच्या कालावधीत भारताने ताज्या फळांच्या निर्यातीमधून तब्बल २,२४४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळवले आहे. फळ उत्पादकांसाठी ही बाब अत्यंत दिलासादायक असून, देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठीही हा एक सकारात्मक संकेत मानला जात आहे. या कालावधीत ३ लाख ४६ हजार मेट्रिक टन फळे निर्यात झाली आहे
ही आकडेवारी केवळ शेतकऱ्यांच्या मेहनतीची नाही, तर भारताच्या फळ उत्पादन क्षमतेच्या जागतिक ओळखीचीही साक्ष आहे. देशातील विविध हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमुळे सफरचंदापासून ते आंब्यापर्यंत, टोमॅटोपासून ते द्राक्षांपर्यंत फळांची विविधता लाभते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि गोवा ही चार राज्ये पश्चिम भारतात फळ उत्पादनात आघाडीवर आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील द्राक्ष, डाळिंब, आंबा, पेरू आणि चिकू या फळांच्या उत्पादनाने परकीय बाजारपेठांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.
फळांच्या गोडीचा व्यापारही गोड
‘मेक इन इंडिया’ यांसारख्या योजना सरकारकडून राबवल्या जात असल्या तरी त्याची अंमलबजावणी गतीने झाली, तरच हा उद्योग जागतिक पातळीवर भारताला आघाडीवर नेऊ शकेल. फळांच्या गोडीचा व्यापारही गोड होतो, हे भारताने पुन्हा सिद्ध केले आहे. आता गरज आहे ती उत्पादनापासून प्रक्रिया आणि निर्यातीपर्यंत एक सशक्त साखळी निर्माण करण्याची, जी देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवा चेहरा देऊ शकेल.
Comments are closed.