नाशिक/एनजीएन नेटवर्क
गुंज फाउंडेशन व आयवोक ऑप्टीकल्स अॅण्ड विजन केअर प्रा. लि.,यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड उपनगर येथील इच्छामणी शाळेतील साधारण 600 विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेे.
या शिबीराचे उद्घाटन श्रीजी डेव्हलपर्सचे संचालक अंजनभाई भिलोडीया यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरात सर्व मुलांची डोळयांची तपासणी नेत्रतज्ञ किशोर आहिरे व निलेश घाग यांनी केली. आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांना गुंज फाउंडेशन तर्फे मोफत चष्मा बनवुन देण्यात येणार आहे. शाळेतील मुलांबरोबरच शिक्षकांच्या डोळयांचीही तपासणी यावेळी करण्यात आली. यावेळी मुलांना साधारण 20 प्रकारचे चष्मे व 5 कलरचे फ्रेम निवडण्याची मुभाही देण्यात आल्याने मुलांनी आपल्या आवडीच्या रंगाचे व डिझाईनचे चष्म्यांची निवड केली.
शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी बोलतांना गुंज फाउंडेशनचे अध्यक्ष अमर कलंत्री यांनी शहरातील व ग्रामीण भागातील तळागाळातील व गरजवंत विद्यार्थ्याची संस्थेतर्फे मोफत डोळयांची तपासणी करण्याचा व त्यांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे देण्याचा मानस असल्याचे सांगितले. टि.व्ही., मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप यांचा अतिवापर तसेच प्रदुषणामुळे मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढत असुन त्याचेमुळे डोळयांवर परिणाम होत आहे व मुलांना कमी वयात चष्मा लागत आहे. योग्य वेळी तपासणी न झाल्यास मुलांचे डोळयाचा चष्म्यांचा नंबर वाढण्याची व दृष्टी कमी होण्याची दाट शक्यता असते. त्याचा विचार करून गुंज फाउंडेशन या सामाजिक संस्थेने, आयवोक ऑप्टीकल्स अॅण्ड विजन केअर प्रा. लि., यांचे मदतीने वरील शिबीर आयोजीत केलेले होते.
या शिबीरासाठी गुंज फाउंडेशनचे अध्यक्ष अमर कलंत्री, उपाध्यक्ष संजय अग्रवाल तसेच संजय गोयल, अखिल राठी, प्रोजेक्ट हेड उमेश जोशी, एकता अग्रवाल, रामकिसन राठी, अंजना गुप्ता, कोमल कलंत्री, पायल राठी, करूणा गोयल, हरीहरन, रोहित वावरे, डॉ. किशोर भंडारी, अजित गुप्ता, प्रशांत गोयल, अॅड. चैतन्य शाह, संदेश कोचर, ममता गोयल तसेच आयवोक ऑप्टीकल्स अॅण्ड विजन केअर प्रा. लि., चे संचालक कर्निलसिंग, इच्छामणी एज्युकेशन सोसायटीचे सचिव एम. डी. कर्हाडकर आदींनी परीश्रम घेतले.