NGN News
Latest Marathi News

डॉ. सोनल कासलीवाल-दगडे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

सेवा पंधरवडा उपक्रमाच्या अंतर्गत उपक्रम ; १०० जणांकडून लाभ

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित सेवा पंधरवडा उपक्रमाच्या अंतर्गत अर्थ फौंडेशनच्या संस्थापिका तथा भाजप महिला मोर्चा महानगर सरचिटणीस डॉ. सोनल कासलीवाल-दगडे यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले. शिबिराचा शेकडो स्त्री-पुरुष गरजूंनी लाभ घेतला.

रामदास गार्डन, सहजीवन कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरप्रसंगी ज्येष्ठ भाजप नेते लक्ष्मण जायभावे, मंडल अध्यक्ष वसंत उशीर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सोनल कासलीवाल-दगडे यांनी शिबिर आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. भविष्यात विविध उपक्रम राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. शिबिरात नागरिकांच्या विविध मोफत तपासण्या करण्यात आल्या. डॉ संदीप जयभावे, डॉ अनुजा वाकचौरे, डॉ प्राजक्त पगार, डॉ. स्नेहल शेटे, यांच्यासह मदतनीस शोभा तुपे, मीरा अस्वले, निकिता गोसावी यांनी तपासण्या करून नागरिकांना मोफत सल्ला दिला.

Comments are closed.