NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

दिंडोरीत मोफत नेत्र चिकित्सा शिबिर; १५० रुग्णांची तज्ञांकडून तपासणी

0

दिंडोरी/एनजीएन नेटवर्क

येथे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न झाले. या शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. स्थानिक नगरसेवक नितीन गांगुर्डे ,नाशिक येथील मॉडर्न आय हॉस्पिटल व एस जी लाईफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिर झाले.

शिबिरात डॉ. रोहित लऊळ , डॉ. वैभव गुळेचा डॉ. अपर्णा घोडके ,शीतल म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. सुमारे १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.गरजूंना चस्मे वाटप करण्यात आले व औषधापाचार करण्यात आले. मोतीबिंदू,डोळे दुःखी , डोळ्यातून पाणी येणे ,नजर कमी होणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.नगर सेवक नितीन गांगुर्डे यांनी नेत्र तपासणी शिबिर घेऊन स्तुत्य उपक्रम राबवला असल्याचे प्रतिपादन शिवसेना तालुकाध्यक्ष अमोल कदम यांनी यावेळी केले.शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अमोल कदम,नगर सेवक नितीन गांगुर्डे ,पत्रकार बापू चव्हाण,पोपट गवारी आदींच्या हस्ते डॉक्टरच्या पथकाचा सत्कार करण्यात आला.नेत्र शिबिर यशस्वीतेसाठी प्रसाद हिरे,शुभम अहिरे,तेजस दीक्षित,आशिष शेवाळे, गुणवंता बेंडकोली एकनाथ हजारे ,मनोज पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.