NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

जिल्ह्यात ५ तालुके दरडप्रवण; भूस्खलनाचा धोका असलेली गावांची सूची..

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील भूस्खलनाने अनेकांचा बळी घेतला. या घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणी निश्चित करुन आवश्यकतेनुसार तेथील कुटुंब स्थलांतरित करावे, असे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा या पाच तालुक्यांना भूस्खलनाचा सर्वाधिक धोका असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अहवालानुसार नाशिक, पेठ, दिंडोरी व कळवण या चार तालुक्यांमधील 43 गावे आणि पाड्यांना भूस्खलनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामध्ये एकट्या कळवण तालुक्यातील 30 ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा या तालुक्यांनाही दरड कोसळण्याचा धोका संभवतो. म्हणूनच जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना भूस्खलनाची ठिकाणे निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पावसाचा जोर वाढल्यास संबंधित ठिकाणच्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशा नागरिकांसाठी तात्पुरत्या निवारागृहासाठी सामाजिक सभागृहे, मंदिर, शाळा आदी ठिकाणे राखीव ठेवावी, अशा सूचना प्रशासनाने तहसीलदारांना दिले आहेत.

जिल्ह्यातील ‘ही’ गावे ‘डेंजर झोन’ मध्ये..

पेठ तालुक्यातील सदरपाडा, बिलकस, बेहडपाडा, गोडसपाडा, देवरपाडा, कासारविहीर, जांबळे तर दिंडोरी तालुक्यातील रडतोंडी, अवंतवाडी, चंडिकापूर, सूर्यगड, पिंप्राज. तसेच कळवण तालुक्यातील तातीनपाडा, जमाळे, कोसुरडे, भावकुर्डे, देसगाव, खर्डे दिगर, उंबरगव्हान, वणी, नांदूर, सप्तशृंगगड, धोडप माची, पायरपाडा आदि गावांना धोका असल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.