नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
जगातील श्रीमंत शहरांच्या या यादीत भारताची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईला 21 वे स्थान मिळालेय. जिथे देशात सर्वाधिक करोडपती राहतात. त्यानुसार मुंबई हे भारतातील सर्वात श्रीमंत शहर आहे. मुंबईनंतर दुसरा क्रमांक राष्ट्रीय राजधानी दिल्लीचा आहे, ज्याला जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत 36 वा क्रमांक मिळवला आहे.
देशातील सिलिकॉन व्हॅली बेंगळुरू हे भारतातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. हेन्ली अँड पार्टनर्सच्या यादीत 60 वे स्थान मिळाले आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताने 63 वा रँक पटकावला आहे. अशा प्रकारे, कोलकाता हे भारतातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. हेन्ले अँड पार्टनर्सच्या यादीत हैदराबादला 65 वे स्थान मिळालेय. जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत हे शहर भारतातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे.