नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशातील सर्व बँकांना फाइव्ह डेज विक म्हणजेच पाच दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील हलचालींना वेग आला असून लवकरच हा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे. सध्या भारतीय बँकांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कामकाज होत नाही. मात्र नवीन धोरण लागू झाल्यास सर्वच शनिवारी बँका बंद राहतील.
बिझनेस लाइनने दिलेल्या वृत्तानुसार, 5 दिवसांचा आठवडा करण्याची मागणी बँक कर्मचाऱ्यांच्या युनियन्सने केली आहे. 28 जुलै रोजी झालेल्या इंडियन बँक असोसिएशनच्या बैठकीमध्ये ही मागणी मांडण्यात आली आणि ती संमतही झाली. भारतामधील सर्व बँकांना 5 दिवसांचा आठवडा लागू होण्याची दाट शक्यता आहे. देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांची संस्था असलेल्या इंडियन बँक असोसिएशनने 5 दिवस कामकाज करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव लवकरच अर्थमंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे. हा प्रस्ताव अर्थमंत्रालयाने मंजूर केल्यास बँकांना सर्व शनिवारी सुट्टी मिळेल. म्हणजेच आता चार आठवड्यांचा महिना असेल तर बँक कर्मचाऱ्यांना महिन्याला 8 सुट्ट्या मिळतील. सध्या सर्व बँकांमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी कामकाज चालते. मात्र नव्या धोरणानुसार सर्वच शनिवारी बँका बंद राहतील.