सोमवारी रात्रीचा थरार; युवक राजकीय कार्यकर्ता असल्याची चर्चा
पंचवटी : एनजीएन न्यूज नेटवर्क
फुलेनगर परिसरात सोमवारी रात्री गोळीबाराच्या घटनेने खळबळउडाली आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या तरुणावर गोळीबार झाला असून त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, युवकाच्या मानेला गोळी लागली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सागर जाधव असे त्याचे नाव आहे.
पंचवटी पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराला जुन्या वादाची किनार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणात नेमका कोणाचा सहभाग आहे, हे शोधण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन महिन्यांपूर्वी पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळी युद्ध घडले होते. त्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असून, या गोळीबारात त्याच टोळीतील काही संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Comments are closed.