मुंबई/एनजीएन नेटवर्क
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेचे निर्माते असिद मोदी यांच्या विरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल करण्यात आली आहे. असिद मोदीबरोबरच आणखी 3 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मालिकेत मिसेज सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने हे आरोप लावले आहेत. असित मोदी बरोबरच शोचे ऑपरेशन हेट सोहेल रमानी आणि एक्सीक्युटिव्ह प्रोड्युसर जतिन बजाज यांच्या विरोधातही FIR दाखल करण्यात आली आहे. काही महिन्यांआधी असिद मोदीवर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. ज्यामुळे ते चर्चेत आले होते. दरम्यान आता त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.
ANI ने दिलेल्या माहितीनुासार, पवई पोलिसांनी असित मोदी, सोहेल रमानी आणि जतिन बजाज यांच्या विरोधात FIR दाखल केली आहे.. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि 509 अंर्तगत त्यांच्यावर FIR करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.