बीड/एनजीएन नेटवर्क
राज्याच्या राजकारणात सध्या एकामागे एक भूकंप सुरू आहेत. राष्ट्रवादी पक्षातून ९ आमदार फुटले असून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांच्या गोटात अस्वस्थता असल्याची चर्चा होती. या पाठोपाठ आता पंकजा मुंडे पक्ष सोडणार का याबाबत चर्चा रंगल्या होत्या. याबाबत आता पंकजा मुंडे यांनी मोठा खुलासा केला आहे.
मी पक्षाबाहेर जाणार अशा चर्चा गेल्या 10 वर्षांपासून सुरू आहेत. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. पुन्हा पुन्हा माझी भूमिका स्पष्ट करणार नाही. मी नाराज आहे असे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र मी माझा पक्ष सोडून कुठेही जात नाही असे विशेष पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सोनिया-राहुलना भेटल्याचा इन्कार
काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांच पंकजा मुंडे यांनी खंडन केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज नाहीत. त्या पक्ष सोडून जाणार की नाही या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांनी थोडी स्पष्टच शब्दात आपली भूमिका मांडली आहे. मी राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटले नाही. पाठित खंजिर खुपसण्याच रक्त माझ्या अंगात नाही. अप्रामाणिकपणा माझ्या रक्तात नाही. मला कोणता निर्णय घ्यायचा असल्यास मी डंके के चोट पे घेणार. मी गांधी कुटुंबाला कधीही भेटले नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.