नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
आयकर रिटर्न भरणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्वाची बातमी आहे. फोन पे ने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. या सर्व्हिसद्वारे, पगारदार व्यक्ती आणि बिझनेस दोघेही त्यांचे टॅक्स जमा करू शकतात. फोन पेद्वारे टॅक्स जमा करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यासाठी तुम्हाला टॅक्स पोर्टलवर लॉग इन करण्याची गरज नाही.
इन्कम टॅक्स फायलिंगची सुविधा प्रदान करण्यासाठी फोन पेने डिजिटल पेमेंट आणि सर्व्हिस प्रदान करणारी कंपनी PayMate सोबत पार्टनरशिप केली आहे. या पार्टनरशिपनंतर नोकरदार व्यक्ती आणि बिझनेस करणारे लोक दोन्हीही आर्थिकवर्ष 2022-23 साठी आपला टॅक्स पेमेंट करु शकतात. या सुविधेविषयी माहिती देताना फोनपेने म्हटलं की, आता आयटीआर फाइल करण्यासाठी टॅक्सपेयर्सला लॉगिनच्या त्रासातून सुटका मिळणार आहे. आता ते सहजपणे टॅक्स जमा करू शकतील. यासोबतच आता टॅक्सपेयर्स आपल्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून टॅक्स जमा करुन 45 दिवसांच्या इंटरेस्ट फ्री पीरियडचा लाभ घेऊ शकतात. एकदा टॅक्स जमा केल्यानंतर त्यांना एक वर्किंग डेच्या आत यूनिक ट्रांझेक्शन रेफरेंस (UTR) नंबर मिळेल. तसंच टॅक्स पेमेंटचं चालान दोन वर्किंग डेच्या आत मिळेल.
.. अशी आहे प्रक्रिया
- यासाठी फोन पे अॅप उघडा आणि इन्कम टॅक्स ऑप्शन निवडा.
- यानंतर, तुम्हाला जमा करायची असलेली टॅक्सची रक्कम, मूल्यांकन वर्ष आणि पॅन कार्ड डिटेल्स टाका.
- नंतर इच्छित रक्कम इंटर करा आणि पेमेंटचा ऑप्शन निवडा.
- यानंतर, पेमेंट केल्यानंतर दोन वर्किंडेमध्ये तुम्हाला पोर्टलचा UTR नंबर मिळेल, जो पोर्टलवर अपडेट करा.