नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि. 27) रोजी एकाच वेळी पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. मेक इन इंडिया धोरणानुसार ICF द्वारे तयार केलेल्या या सेमी हायस्पीड ट्रेन्स देशभरातील विविध शहरांना जोडतील. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाड्या गोवा-मुंबई, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरू-हुबळी-धारवाड या मार्गांवर सुरू होतील.
या नवीन गाड्या सुरू झाल्यामुळे देशातील रेल्वे नेटवर्कवर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची संख्या 23 वर जाईल. तसेच, या गाड्या जोडल्या गेल्याने या शहरांतील रहिवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहेत. उद्घाटनाबाबत रेल्वे मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. मात्र विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मंगळवारी पाच वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची बातमी शेअर केली.