
- निवडक उपकरणांवर ३५%* पर्यंत सूट, ४५,०००* रुपयांपर्यंतकॅशबॅक आणि अतुलनीय टेक डील्स
- अॅपल डिव्हाइसेसवर विशेष ऑफर्स, आकर्षक ईएमआय पर्याय आणि विविध कॅटेगरीवरील डील्समुळे सणासुदीच्या खरेदीचा आनंद आणखी द्विगुणित होत आहे.
- ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांवर सणासुदीच्या ऑफर्सचा फायदा घेऊन बचत करू शकतात, तसेच बँक, एनबीएफसी आणि एक्सचेंज बोनसच्या माध्यमातून अतिरिक्त लाभही मिळवू शकतात.
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
टाटा ग्रुपचा एक भाग आणि ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर ‘क्रोमा’ने इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांवर शानदार ऑफर्ससह आपले वार्षिक फेस्टिव कॅम्पेन ‘फेस्टिव्हल ऑफ ड्रीम्स’ची घोषणा केली आहे. ग्राहक निवडक उपकरणांवर थेट ३५% सूट*, बँक आणि एनबीएफसी ऑफर्सद्वारे ४५,०००* रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि २०,०००* रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा लाभ घेऊ शकतात. सणासुदीच्या आधी आपले घर आणि वैयक्तिक गॅजेट्स अपग्रेड करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
क्रोमाच्या सर्व स्टोअर्समध्ये उपलब्ध असलेल्या या कॅम्पेनमध्ये वेगवेगळ्या उत्पादनांवर डिस्काउंट, ईएमआय पर्याय, एक्सचेंजचे फायदे आणि अतिरिक्त बचत एकाच वेळी सादर करण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या सणासुदीच्या खरेदीवर जास्तीत जास्त फायदा मिळावा. या सर्व ऑफर्स लागू नियम आणि अटींसह ३१ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत वैध आहेत.
अॅपल डिव्हाइसेसवर विशेष ऑफर्स
उत्कृष्ट एक्सचेंज व्हॅल्यू आणि बँक कॅशबॅक ऑफर्समुळे क्रोमा हे अॅपलप्रेमींसाठी भारतातील सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे. या ऑफर्सअंतर्गत आयफोन 17 ची प्रभावी किंमत योग्य एक्सचेंज आणि कॅशबॅक ऑफर्सनंतर ५८,९९० रुपयांपासून, आयफोन 17 प्रो ची ९४,४९० रुपयांपासून, तर आयफोन 17 प्रो मॅक्स ची १,०७,९९० रुपयांपासून सुरू होते. मॅकबुक एअर एम5 वर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सवलत, योग्य एक्सचेंज आणि बँक कॅशबॅक ऑफर्सचा लाभ घेऊन त्याची प्रभावी किंमत १,०१,९१० रुपयांपासून सुरू होते. तसेच, आयपॅड (11वे जनरेशन) वर लागू कूपन, स्टोअर डिस्काउंट आणि बँक कॅशबॅक ऑफर्सनंतर त्याची प्रभावी किंमत ४२,०६५ रुपयांपासून उपलब्ध आहे.
सिनेमॅटिक होम एंटरटेनमेंट आणि मोठ्या होम अप्लायन्सेसवर आकर्षक ऑफर्स
मोठ्या स्क्रीनवरील मनोरंजनाचा आनंद आणि स्मार्ट, ऊर्जा-बचत करणाऱ्या उपकरणांसह यंदाचा सणासुदीचा काळ अधिक खास बनवण्यासाठी क्रोमाने विविध उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स सादर केल्या आहेत. टेलिव्हिजनच्या श्रेणीत एलजी ५५-इंच एआय नॅनो टीव्हीची किंमत ४१,९९० रुपयांपासून, सॅमसंग ६५-इंच 4 के मिनी एलईडी टीव्हीची किंमत ७६,९९० रुपयांपासून, तर सोनी ७५-इंच ब्राव्हिया २ 4के टीव्हीची किंमत १,१९,९०० रुपयांपासून सुरू होते.
कूलिंग आणि कम्फर्ट
घरातील आरामदायी वातावरणासाठी गोदरेज १.५ टन इन्व्हर्टर एसी २८,९९० रुपयांपासून उपलब्ध असून, ग्राहकांना २,४१६ रुपये प्रतिमहिना या सोप्या ईएमआयचा पर्यायही मिळू शकतो. याशिवाय, आघाडीच्या ब्रँड्सच्या सीलिंग फॅन्सवर बंडल डिस्काउंट देण्यात येत आहे. एक पंखा खरेदी केल्यास ५ टक्के, दोन पंखे खरेदी केल्यास १० टक्के, तर तीन पंखे खरेदी केल्यास १५ टक्के सवलतीचा लाभ ग्राहकांना घेता येईल.
घरगुती गरजांसाठी आकर्षक डील्स
घरातील दैनंदिन गरजा पूर्ण करणाऱ्या उपकरणांवरही क्रोमाने विशेष ऑफर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. एलजी ८ किलोग्रॅम टॉप-लोड वॉशिंग मशीनची किंमत २१,७९० रुपयांपासून सुरू होते. तसेच, एलजी २८८-लिटर फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटर निवडक स्टोअर्समध्ये ३५,४९१ रुपयांपासून उपलब्ध आहे.
नेक्स्ट-जेन कम्प्युटिंग, स्मार्टफोन आणि ऑडिओ
तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांसाठी क्रोमाने लॅपटॉप, स्मार्टफोन आणि ऑडिओ उत्पादनांवरही आकर्षक ऑफर्स सादर केल्या आहेत. एचपी व्हिक्टस गेमिंग लॅपटॉप, ज्यामध्ये एएमडी रायझेन 7 प्रोसेसर, 12जीबी रॅम आणि 512 जीबी एसएसडी आहे, त्याची किंमत ८१,१४० रुपयांपासून सुरू होते. लेटेस्ट अँड्रॉइड स्मार्टफोन मॉडेल्सवर ईएमआयचा पर्याय १,५९९ रुपये प्रतिमहिन्यापासून उपलब्ध आहे. याशिवाय, मार्शल ब्लूटूथ स्पीकर्सवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच, २,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही खरेदीवर क्रोमाचा १२० वॅट साउंडबार केवळ ५,४०० रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळेल.
एकाच वेळी अनेक फेस्टिव्हल ऑफर्ससह मोठी बचत
ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि प्रत्येक बजेटमध्ये जास्तीत जास्त बचतीचा लाभ मिळवून देण्यासाठी क्रोमाने अनेक आकर्षक डील्स सादर केल्या आहेत. प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्ड तसेच एनबीएफसी भागीदारांमार्फत ग्राहकांना ४५,००० रुपयांपर्यंतचा त्वरित कॅशबॅक मिळू शकतो. जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एक्सचेंजवर निवडक होम अप्लायन्सेस आणि डिजिटल उत्पादनांवर २०,००० रुपयांपर्यंतचा निश्चित एक्सचेंज बोनसही उपलब्ध आहे. याशिवाय, टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील निवडक क्रोमा स्टोअर्समध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्टॉक उपलब्ध असेपर्यंत विशेष मोफत भेटवस्तू मिळतील. या सर्व ऑफर्समुळे ग्राहकांना सणासुदीच्या खरेदीत विविध उत्पादनांवर बचत करण्याची संधी मिळणार आहे.
या ऑफर्स ग्राहकांना प्रत्येक बजेट आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये खरेदीचे उत्तम पर्याय देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. याचे लाभ उत्पादन, पेमेंट मोड, एक्सचेंज आणि स्टोअरनुसार वेगवेगळे असू शकतात.
या सर्वोत्तम ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या क्रोमा स्टोअरला, क्रोमा डॉट कॉम ला किंवा टाटा नेउ अॅपला भेट देऊन ‘फेस्टिवल ऑफ ड्रीम्स’ ऑफर्स पाहू शकतात. क्रोमाचे ओम्नी-चॅनेल शॉपिंग मॉडेल ग्राहकांना ऑनलाइन रिसर्च करण्यासोबतच स्टोअरमध्ये तज्ञांची मदत घेण्याची आणि आपल्या आवडीनुसार फुलफिलमेंट पर्याय निवडण्याची पूर्ण सुविधा देते.
*ऑफर निवडक उत्पादने, ब्रँड्स आणि कॅटेगरीवर लागू आहेत तसेच उपलब्धता, पात्रता निकष आणि लागू नियम व अटींच्या अधीन आहेत. किमती आणि ऑफर्स वेगवेगळ्या उत्पादनांनुसार, स्टोअर्स आणि शहरांनुसार बदलू शकतात. अॅपलच्या प्रभावी किमती ठराविक ऑफर गृहितकांवर आधारित आहेत आणि पात्रता, एक्सचेंज व्हॅल्यू व लागू असलेल्या फायद्यांनुसार बदलू शकतात. ईएमआईची रक्कम लागू कालावधी, पात्रता आणि वित्तीय अटींच्या अधीन आहे. बँक, एनबीएफसी, एक्सचेंज, बिल बस्टर आणि इतर प्रमोशनल लाभ त्यांच्या संबंधित अटींच्या अधीन आहेत. नियम व अटी लागू.
Comments are closed.