निफाड/एनजीएन नेटवर्क
तालुक्यात युरियाचा काळाबाजार पोलिसांनी उघड केला असून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयिताना ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मोठ्या प्रमाणातील युरिया काळ्याबाजारात विकण्यासाठी मुंबईत जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव रस्त्यावरील भरवस फाटा येथे एका वस्तीवर पोलिसांनी युरियाचा साठा पकडला. केंद्र शासनाचा अनुदानित प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परीयोजना शिक्का असलेल्या एका गोणीतून दुसऱ्या खासगी गोणीत युरिया भरलेल्या ४०० ते ५०० गोण्या एका मालवाहतूक वाहनात आढळल्या. या गोण्या काळ्याबाजारात विकण्यासाठी २० लाख रुपयांच्या गोण्या निफाडहून मुंबईत एका कंपनीत नेण्यात येणार होत्या. पोलिसांनी संशयितासह चालक, सहचालक यांना ताब्यात घेतले आहे.