NGN News
Latest Marathi News

नाला बंडिंग फुटली, शेतकऱ्याची विहीर बुजली, सुपीक मातीही वाहून गेली

वाघाळे येथील शेतकरी हताश; अतिवृष्टीमुळे 80 हजाराचे नुकसान

येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क

तालुक्यातील पूर्व भागात सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे झालेल्या अचानक मुसळधार पावसाने वाघाळे (ता. येवला) येथील शेतकरी भाऊसाहेब जगन्नाथ सोमासे यांच्या शेताजवळील नाला बंडिंग फुटल्याने पाणी, चिखल, माती व दगड गोटे थेट विहिरीत कोसळून विहीर पूर्णपणे बुजली आहे.

यात विहिरीचे सुमारे ₹८०,००० चे नुकसान झाले आहे. त्यांनी आपली विहीर पूर्ववत करून देऊन त्याचा पूर्ण खर्च शासनाने उचलावा अशी मागणी केली आहे. अरुण पंढरीनाथ सोमासे यांच्या घरासमोरील नाला बंडिंग फुटल्याने त्यांच्या पिकासाह शेताची माती ही वाहून गेली असून शेताचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता माती कुठून आणावी असा प्रश्न शेतकरी भाऊसाहेब सोमासे आणि अरुण सोमासे यांना पडला आहे.

दोन्हीही शेतकऱ्यांनी आपल्या विहिरी व बंडिंग दुरुस्तीबाबत माननीय तहसीलदार, कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.