नाशिक/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व मदत फाउंडेशनच्या वतीने आज दहावी व बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. आज त्रिमूर्ती नगर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संपर्क कार्यालयात या गुणवंत विद्यार्थ्यांना फेटे बांधत सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शंकर मोकळ, सोनवणे काका, दिनकर अण्णा लोहकरे, गणेश काका शिंदे, बापू तांबे, संदीप वाघ, विनायक वाघ, जितू विसपुते, अमोल मुंडे, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, अशोक पाटील, राम शिंदे, सागर तांबे, राज रंधवा, रोहित जाधव, सुशील सोळंकी, संतोष पुंड, जॉनी सोळंकी, कपिल निकम यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.