सप्तशृंगी गड/एनजीएन नेटवर्क
विक्रीसाठी असलेल्या मालावर कुठल्याही प्रकारचे बेस्ट बिफ़ोरचे टॅग न देण्यात आल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सप्तशृंगी गडावर दहा पेढे विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, विक्रेते अक्षय रामचंद्र बाटै यांचे आई भगवती पेढा सेंटर, कुंडलिक ईश्वर शिंगटे यांचे भगवती पेढा सेंटर, रणजित नागनाथ सायकर यांचे आई साहेब पेढा सेंटर, हनुमंत परसु यादर यांचे पेढा विक्री केंद्र, केशव श्रीरंग खुणे यांचे आराध्या पेढा सेंटर, गौरख दादा हरी साळुंके यांचे भगवती प्रसाद पेढा सेंटर, संदीप शशीकांत बेनके यांचे पेठा विक्री केंद्र, विठ्ठल रावसाहेब शिंदे यांचे जय माँ सप्तश्रृंगी पेढा सेंटर, संदीप नारायण अडगळे यांचे भगवती पैदा सेंटर, प्रल्हाद नामदेव गव्हाणे यांचे मयुरी प्रसाद पेढा सेंटर आदी 10 विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली.
आपापल्या आस्थापनात दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी साठविल्याचे आढळून आले. परंतू त्यावर कुठल्याही प्रकारचे अंतिम टिकण्याची क्षमता याबाबतचे टॅग नसल्याचे आढळले. तसेच अन्न सुरक्षा मानके कायदयाच्या स्वच्छतेविषयक बाबींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्व पैढ़ा विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा मानके कायदयाच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली