नाशिक/एनजीएन नेटवर्क
अन्न व औषध प्रशासनाच्या उपहारगृह तपासणी मोहिमेंतर्गत शहरातील आठ उपहारगृहांची (हॉटेल्स) तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार हे अभियान पार पाडण्यात आले.
सदर मोहिमेंतर्गत हॉटेल व्हेज ॲरोमा (गंगापुर रोड), हॉटेल उडपी तडका (सोमेश्वर मंदिरासमोर), हॉटेल दिल से देसी (गंगापूर रोड), हॉटेल काका का ढाबा (जेहान सर्कल) हॉटेल सयाजी (इंदिरानगर), हॉटेल कोटयार्ड बाय मेरीअट (मुंबई नाका), हॉटेल सियोना रेस्टॉरंट आणि हॉटेल आरटीसन स्पिरिट प्रा.लि.(दोन्ही गंगाव्हरे गाव, ता.नाशिक) या आठ उपहारगृहांची तपासणी करण्यात आली.
तपासणीत काय आढळले ?
अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीअंती बऱ्याच हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे परिशिष्ट 4 चे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यात प्रामुख्याने शीतपेटीत मुदतबाह्य अन्न पदार्थ साठवण केल्याचे आढळले. तसेच मासांहरी (चिकण) व दुग्धजन्य पदार्थ हे मुदतबाह्य झालेले असून साठविलेले आढळले आहे. स्वयंपाकगृहात अस्वच्छता आढळली. खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केलेली नसल्याचे तसेच त्यांना डोक्याला टोपी, हातमोजे व ॲपरॉन्स दिलेले आढळून आले नाही. स्वयंपाकघरात योग्य सुर्यप्रकाश तसेच योग्य रंग दिलेला नसल्याचे निदर्शनास आले. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा विश्लेषण अहवाल ठेवलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा त्रूटी आढळून आलेल्या उपहारगृहांना सुधारणा करणेसंदर्भात नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.
——————————–
@उपहागृह व्यावसायिकांनी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना दर्जेदार अन्न पदार्थ उपलब्ध होण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी.
- सं.भा. नारागुडे, सह आयुक्त (नाशिक विभाग) अन्न व औषध प्रशासन