NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

कांदा निर्यात शुल्काविरोधात बागलाणमध्ये शेतकरी संघटनांचा एल्गार

0

सटाणा/एनजीएन नेटवर्क

केंद्र सरकारने शनिवारी रात्री अचानक कांदा निर्यात शुल्क 40 टक्के केल्याच्या निषेधार्थ बागलाण तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांच्यावतीने वतीने जाहीर निषेध केला. दरम्यान, हा निर्णय मागे न घेतल्यास मंगळवारपासून बाजार समितीचे कामकाज बेमुदत बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव, नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे उप अध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, तालुका अध्यक्ष केशव सुर्यवंशी, व्यंगचित्रकार किरण मोरे ,प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार खैरनार आदींनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध केला. केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लागु केल्याने व्यापारी वर्गांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ते भविष्यात कांदा निर्यात करण्यास धजावणार नाही, असे स्पष्ट मत कुबेर जाधव यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा येत्या मंगळवारपासून बाजार समितीचे कामकाज बेमुदत बंद करून जाहीर निषेध करण्याचा इशारा देण्यात आला.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी दिला आहे, देवळा तालुका अध्यक्ष माणिक निकम,भास्कर सोनवणे, ,किरण निकम, देवीदास आहिरे,नयन सोनवणे,भास्कर जाधव, रूपेश जाधव,विठोबा पवार, श्रीपाद जाधव,आबा जाधव,वसंत जाधव ,विनोद जाधव ,बापू जाधव,अनिल वाघ,राहुल जाधव,छगन जाधव, सुनील जाधव, शिवजी सुर्यवंशी, गौरव शेवाळे, कल्पेश पवार,यश पवार, गजानन पवार,सागर वाघ,सुदर्शन जाधव,नितिन खैरनार, विकि जाधव,प्रवीण जाधव,धिरज जाधव,यशवंत गुंजाळ,शरद देवरे, ऋषिकेश ह्यलिज,निलकंठ भालेराव,प्रदीप वाघ ,प्रथमेश पवार, बाळकृष्ण पवार,महेंद्र जाधव,रवि सोनवणे, सुनील,सोनवणे, मनीष सोनवणे, वसंत आहिरे,प्रकाश सोनवणे,विशाल आहिरे,केदा आहिरे,ललित सोनवणे,नितिन सोनवणे, केवळ सोनवणे, मनोज सोनवणे,संजय आहिरे,कैलास आहिरे,प्रवीण ठाकरे आदीसह शेकडो कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध करून घोषणाबाजी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.