NGN News
Latest Marathi News

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत; ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; राज्यात 60 लाख हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज 

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्यात गेल्या 15 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, राज्यात 60 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहिल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे जाहीर केले. मॅन्यूअलमध्ये ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही, तरीही दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्या जातील, असेही ते म्हणाले.

राज्यात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी झाली आहे, यासंदर्भात आढावा घेतला असून 60 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली असून मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यानुषंगाने पहिल्या टप्प्यात आपण 2115 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरीत करण्याची कामे सुरू झाले आहेत. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचा असेसमेंट घेता येत नव्हते आणि म्हणून त्यांना अधिकचा वेळ आपण दिला आहे. पुढच्या दोन-तीन दिवसात ही सगळी माहिती पोहोचेल त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल. 

कॅन्सर केअर पॉलिसी

राज्याच्या मंत्रिमंडळाने आज अजून काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी निर्णय केलेले आहेत. ज्याच्यामध्ये राज्याची एक सर्वंकष कॅन्सर सेवा पॉलिसी कॉम्पियन्स कॅन्सर केअर पॉलिसी आपण तयार केलेली आहे. या कॅन्सर केअर पॉलिसीच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना कॅन्सरच्या उपचार हा उपलब्ध राहिला पाहिजे अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे. यात सेंटर आणि एल थ्री सेंटरचे जाळ आपण तयार करत आहोत. जेणेकरून कोणालाही कॅन्सरसारख्या या बिमारीची ट्रीटमेंट मिळण्याकरता त्यांच्या जिल्ह्यामध्येच जवळपास महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध असतील, काहींना काही गोष्टींकरिता सेंटरला काही ठिकाणी जावे लागेल. पण, याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे जे रोगनिदान आहे, त्याच्यावर उपचार आहेत. त्याची सुलभता आणि त्याची कॉस्ट कमी करणे हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे, असेही मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.

Comments are closed.