- उच्चशिक्षित डॉक्टरसह सहा जणांना कोठडी
सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क
पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा वापर करणाऱ्या एका टोळीला सटाणा पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तातडीची कारवाई करून एका मोटारीतून 15 हजार रुपये किमतीच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या कारवाई अंतर्गत एका उच्चशिक्षित डॉक्टरसह सहा युवकांना ताब्यात घेण्यात आले. या सर्वाना न्यायालयाने 24 डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रेनॉल्ड्स ट्यूबर चारचाकी वाहनातून बनावट नोटा शहरात आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. यात्रास्थळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची तात्काळ हालचाल सुरू झाली. यानुसार बनावट नोटा असलेल्या टोळीने सटाणा ताहाराबाद मार्गावर असलेल्या एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरले. या ठिकाणी त्यांना बनावट नोटा देत असतानाच पोलिसांनी रंगेहाथ पकडले. शहरात एकीकडे देवमामलेदार यशवंत महाराज यांची यात्रा सुरु असताना हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
Comments are closed.