NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

बंदद्वार चर्चेचे सोपस्कार.. फडणविसांचा शिवसेना मंत्र्यांना ‘हा’ कानमंत्र !

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

शिवसेनेचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. युतीमध्ये सुरू असलेल्या वादाबद्दल शिवसेना मंत्री आणि फडणवीस यांच्यात स्पष्टपणे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना कानमंत्र दिला आहे.

कोणीही चिंता करायची गरज नाही, या गोष्टी होतच राहणार. सर्वांनी सर्वच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आपण एकत्रच आहोत. ज्या गोष्टी कानावर पडतात त्याकडे दुर्लक्ष करा. युतीत खडा पडेल, असे कोणतेही वक्तव्य माध्यमांसमोर करू नका, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला आहे.

आपली ताकद ओळखणे गरजेचे : किर्तीकर

दरम्यान काल झालेल्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी आमदारांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या वाढत्या दबावतंत्रावर कालच्या बैठकीमध्ये गजानन किर्तीकर यांनी सचूक वक्तव्य केले. 40 आमदार एकत्र आले म्हणून भाजप पुन्हा सत्तेत आली. 40 आमदारांनी आपली ताकद ओळखणे गरजेचे आहे. 40 आमदार सोबत होते म्हणूनच महाविकासआघाडीची सत्ता उलथवून टाकली. मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंना पायउतार केलं आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर बसवलं, असं गजानन किर्तीकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.