नाशिक/एनजीएन नेटवर्क ” मृत्यूनंतर कुणालाच सोबत काही नेता येत नाही . आठवणी आणि कामाशिवाय मागेही काही राहात नाही . गरजूंच्या जीवनात नव्याने प्रकाश फुलवण्याचे सामर्थ्य विविध प्रकारचे अवयवदान व देहदानामध्ये आहे . त्यामुळे प्रत्येकाने जिवंतपणीच अशा दानांचा संकल्प करणे ही काळाची गरज आहे . आजच्या नेत्रदान दिनी आपल्यातल्याप्रत्येकाने अशा दानांचा संकल्प करूया .” असे आवाहन आय. एम. ए. नाशिक चे अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ यांनी केले.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी, नाशिक जिल्हा शाखा व सुरभी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नेत्रदानदिनानिमि त्त आयोजित नेत्रदान, अवयवदान, देहदान संकल्प मोहिमेचा शुभारंभ करतांना ते बोलत होते . अध्यक्षस्थानी रेडक्रॉस चे माजी सचिव मेजर पी.एम.भगत होते तर व्यासपीठावर रेडक्रॉस सचिव डॉ. सुनील औंधकर , सुरभी हॉस्पिटलचे छातीविकार तज्ज्ञ डॉ. अनिर्बान बंडोपाध्याय, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्वेता बंडोपाध्याय, रेडक्रॉस कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रतिभा औंधकर, प्रतिभा भगत उपस्थित होते.
दरम्यान मोहिमेसाठी भित्तिचत्रे व संकल्पपत्रे तयार करण्यात अली असून यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी रेडक्रॉस शी अथवा ९४२२२४८३८० क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.